PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार

पीएम किसान योजनेचे २००० रुपये दर ३-४ महिन्यांनी शेतकऱ्यांना मिळत असतात. यापूर्वी २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी मिळाला होता. त्यावेळी देशभरातील ९.७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले होते

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या 21 व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. सूत्रांनुसार, हा हप्ता १५ नोव्हेंबर रोजी जारी केला जाऊ शकतो. यापूर्वी २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी मिळाला होता. आता 21 वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.

पीएम किसान योजनेचे २००० रुपये दर ३-४ महिन्यांनी शेतकऱ्यांना मिळत असतात. यापूर्वी २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी मिळाला होता. त्यावेळी देशभरातील ९.७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा झाली. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाही लवकरच पैसे मिळतील असे शासनाने सांगितले आहे. आता २१ वा हप्ता नोव्हेंबरच्या मध्यात म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी जारी केला जाऊ शकतो (PM Kisan Yojana) असे मानले जातेय.

काय आहे योजना (PM Kisan Yojana)

शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेती करताना त्याना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बँक खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे २० हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असून आता २१ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.

पूरग्रस्तांना आधीच मिळाला २१ वा हप्ता

दरम्यान, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या ३ राज्यात महापुरामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याने केंद्र सरकारने २६ सप्टेंबर २०२५ रोजीच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जमा केला होता. तर जम्मू आणि काश्मीरसाठी हप्ता ७ ऑक्टोबर रोजी जारी झाला. आता इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनाही लवकरच त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News