आपण पूजा करताना आपल्या कपाळावर टिळा किंवा गंध लावतो, कपाळावर चंदन किंवा कुंकवाचा टिळा असतो. टिळा किंवा गंध लावणे ही आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे. हिंदू धर्मात टिळा लावणे खूप महत्वाचे मानले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार, टिळा लावणे पवित्र आणि फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का कपाळावर टिळे का लावले जातात आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे. जाणून घेऊयात….
आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व
कपाळावर गंध लावल्याने देवाची कृपा राहते असे मानले जाते आणि पूजा पूर्ण मानली जात नाही. टिळा लावणे हे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. टिळा किंवा गंध लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वाईट ग्रह शांत होतात, अशी श्रद्धा आहे. कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात टिळा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही असे मानले जाते.

दोन्ही भुवयांच्या मध्यभागी टिळा लावणे हे ‘तिसऱ्या डोळ्याचे’ किंवा आज्ञा चक्राचे प्रतीक मानले जाते. या ठिकाणी टिळा लावल्याने एकाग्रता वाढते आणि शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित राहतो. टिळा लावल्याने नवग्रह शांत होतात आणि त्यांची नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते.
चंदनाचा टिळा
चंदनाचा टिळा लावल्याने घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही आणि सौभाग्यही वाढते. तसेच, हा टिळा पाप नष्ट करतो आणि जीवनातील नकारात्मकता दूर ठेवतो. चंदनाचा टिळा लावल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि घरात धन व सौभाग्य वृद्धी होते अशी श्रद्धा आहे.
वैज्ञानिक महत्त्व
- गंध लावल्याने मन एकाग्र होते आणि विचार शांत राहतात, असे मानले जाते.
- चंदन, हळद आणि अष्टगंध यांसारख्या औषधी द्रव्यांमुळे शरीराला थंडावा मिळतो आणि शांत वाटते.
- टिळा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील उष्णता कमी होते.
- टिळा लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, असे मानले जाते
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











