हिंदू धर्मात वर्षातील सर्व १२ महिने विशेष आहेत. मार्गशीर्ष हा मराठी दिनदर्शिकेतील नववा महिना. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्ष महिना कधी? मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आहेत? जाणून घ्या…
यंदा मार्गशीर्ष महिना कधी?
यंदा मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरु होत आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार आहेत. दर गुरुवारी महिला घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा करतात.

मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार
- पहिला गुरुवार – 27 नोव्हेंबर
- दुसरा गुरुवार – 04 डिसेंबर
- तिसरा गुरुवार -11 डिसेंबर
- चौथा गुरुवार – 18 डिसेंबर
मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व
मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात केली जाणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा विशेष फलदायी ठरते. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते. पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











