Shubman Gill Hospitalized : कर्णधार गिल हॉस्पिटलमध्ये भरती; टीम इंडियाला मोठा झटका

वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर कॅप्टन शुभमन गिल फलंदाजीसाठी आला. दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर, गिलने तिसऱ्या चेंडूवर स्वीप शॉट मारला आणि चौकार मारला. परंतु हा शॉट मारताना गिलच्या मानेला तीव्र वेदना जाणवल्या

Shubman Gill Hospitalized : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील इडन गार्डन येथील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर गिल तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे. आज सकाळीच गेलच्या मादीला दुखापत झाल्याने तो रिटायर होल्ट झाला होता. आता तो तातडीने वूड्स लँड रुग्णालयात भरती झाल्याने टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. गिल या कसोटीच्या दुसऱ्या डावात खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे.

गिलला दुखापत कशी झाली?? Shubman Gill Hospitalized

भारतीय संघाच्या फलंदाजी वेळी दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर कॅप्टन शुभमन गिल फलंदाजीसाठी आला. दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर, गिलने तिसऱ्या चेंडूवर स्वीप शॉट मारला आणि चौकार मारला. परंतु हा शॉट मारताना गिलच्या मानेला तीव्र वेदना जाणवल्या आणि त्याने लगेचच त्याचे हेल्मेट काढले. टीम फिजिओने त्याची तपासणी केली आणि त्यानंतर तो रिटायर हर्ट झाला. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर ३५ व्या षटकात ही घटना घडली. Shubman Gill Hospitalized

कशी आहे गिलची तब्ब्येत

आज संपूर्ण रात्रभर गिल डॉक्टरांच्या देखरेखी खाली असणार आहे. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल म्हणाले, “त्याला मानेत दुखणे कसे झाले हे आपल्याला शोधून काढावे लागेल. कदाचित काल रात्री तो नीट झोपला नसेल त्यामुळे त्याच्या मानेला त्रास झाला असेल कारण त्याचा त्याच्या कामाच्या ताणाशी काहीही संबंध नाही.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेचे नेतृत्व केल्यापासून शुभमन गिल सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर तो भारतीय संघात सामील झाला आणि मंगळवारी पहिल्या सराव सत्रात भाग घेतला.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News