Girija Oak : गिरिजा ओकचा थरारक अनुभव; म्हणाली त्याने मानेपासून कमरेपर्यंत….

अचानक एक अनोळखी मुलगा मागून आला आणि गर्दीचा फायदा घेत तिच्या पाठीवर मानेपासून कंबरेपर्यंत बोट फिरवले. “मला त्याची चाहूलही लागली नाही… तो कुठून आला, कसा आला, काहीच कळलं नाही.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक (Girija Oak) सध्या चर्चेत आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलेला धक्कादायक अनुभव सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अभिनय, लूक आणि व्यक्तिमत्त्वामुळे चाहत्यांची मने जिंकणारी गिरिजा, तिच्या साधेपणाने आणि सौंदर्याने ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखली जात आहे. मात्र या चर्चेत असतानाच तिने उघड केलेला एक वैयक्तिक अनुभव तिच्या चाहत्यांना हादरवणारा ठरला.

लोकल ट्रेनमधील त्रासदायक अनुभव (Girija Oak)

गिरिजाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत लोकल ट्रेनमधील एक जुनाच पण अस्वस्थ करणारा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “लोकलमध्ये अचानक कोणीतरी मागून येऊन वाईट पद्धतीने स्पर्श करणे, धक्का देणे… हे अनेकांसाठी ‘सामान्य’ झालंय. पण ते किती त्रासदायक असतं, हे फक्त अनुभवणाऱ्या व्यक्तीलाच कळतं.”

त्या दिवशी ती (Girija Oak) नेहमीप्रमाणे लोकलने प्रवास करत होती. अचानक एक अनोळखी मुलगा मागून आला आणि गर्दीचा फायदा घेत तिच्या पाठीवर मानेपासून कंबरेपर्यंत बोट फिरवले. “मला त्याची चाहूलही लागली नाही… तो कुठून आला, कसा आला, काहीच कळलं नाही. काही सेकंदांत तो वळून निघून गेला,” असे सांगताना गिरिजा visibly अस्वस्थ झाल्याचे दिसले. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे ती काही क्षण थबकूनच गेली. त्या मुलाची ओळखही तिला पटली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला ‘सिंपल लूक’

या गंभीर चर्चेबरोबरच मुलाखतीतील गिरिजाचा साधा, देखणा लूकही प्रचंड व्हायरल होत आहे. फिकट निळ्या रंगाची साधी कॉटन साडी, पांढरा स्लीव्हलेस ब्लाऊज, मोकळे केस आणि सिंपल दागिने या साधेपणातही तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसले. या लूकमुळे चाहत्यांनी तिला ‘न्यू नॅशनल क्रश’ अशी उपाधी दिली आहे. गिरिजाने मांडलेला अनुभव महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणतो. तिच्या या मनमोकळ्या कबुलीमुळे अनेक महिला तिच्याशी जोडल्या गेल्या असून सोशल मीडियावरही याविषयी चर्चा सुरू आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News