Varanasi Movie Trailer : राजामौलींच्या ‘वाराणसी’चा भव्य फर्स्ट लूक प्रदर्शित; महेश बाबू ‘रुद्ध्र’च्या शक्तिशाली अवतारात

राजामौलींच्या या पौराणिक-आधारित महाकाव्यकथे मध्ये महेश बाबू ‘रुद्ध्र’ नावाचा शक्तिशाली आणि दैवी योद्धा साकारत आहेत. पोस्टरमध्ये ते त्रिशूल हाती घेऊन धावत्या बैलावर स्वार झालेले दिसतात

Varanasi Movie Trailer : दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या बहुप्रतिक्षित ‘वाराणसी’ या चित्रपटाचा शानदार फर्स्ट लूक अखेर समोर आणला आहे. ग्लोबट्रॉटर इव्हेंटमध्ये पोस्टर आणि चित्रपटाचे शीर्षक अनावरण करण्यात आले. या पोस्टरमध्ये दिसलेला महेश बाबूचा उग्र आणि भव्य लूक चाहत्यांना अक्षरशः थक्क करणारा ठरला.

रुद्ध्रच्या भूमिकेत महेश बाबू (Varanasi Movie Trailer)

राजामौलींच्या या पौराणिक-आधारित महाकाव्यकथे मध्ये महेश बाबू ‘रुद्ध्र’ नावाचा शक्तिशाली आणि दैवी योद्धा साकारत आहेत. पोस्टरमध्ये ते त्रिशूल हाती घेऊन धावत्या बैलावर स्वार झालेले दिसतात. हा दृश्यात्मक क्षण त्यांच्या पात्राच्या अथांग शक्तीची आणि महाकाय व्यक्तिमत्त्वाची झलक देतो. Varanasi Movie Trailer

भव्य टाइटल टीजरने वाढवली उत्सुकता

पोस्टरसोबतच टायटल टीजरदेखील रिलीज झाला. त्यातून कथा वेळ, कालखंड आणि भूगोलाच्या सीमा ओलांडणाऱ्या अद्भुत विश्वाची अनुभूती देणारी आहे, हे स्पष्ट झाले. राजामौली यांनीही या प्रोजेक्टला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगितले.

या अनावरणावेळी राजामौली म्हणाले, “आम्ही सामान्यतः प्रेस कॉन्फरन्स घेऊनच चित्रपटांची घोषणा करायचो. पण ‘वाराणसी’ची भव्यता शब्दांत सांगता येणार नाही, हे लक्षात आलं. म्हणूनच आम्ही एका व्हिज्युअल व्हिडिओद्वारे प्रोजेक्टचा पैमाना मांडण्याचा निर्णय घेतला. काही विलंब झाला असला तरी अखेर हा अनुभव प्रेक्षकांसमोर आणताना आनंद होत आहे.”

प्रियंका चोप्राचे दमदार पुनरागमन

या चित्रपटातून प्रियंका चोप्रा भारतीय सिनेमात जोरदार पुनरागमन करत आहे. ती ‘मंदाकिनी’ ही भूमिका साकारणार असून, तिचा पहिला पोस्टरही चर्चेत आहे. अॅक्शन-प्रधान भूमिकेत प्रियंका पुन्हा पाहायला मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

चित्रपटातील मुख्य प्रतिनायक ‘कुम्भा’ ही भूमिका पृथ्वीराज सुकुमारन साकारत आहेत. त्यांचा लूक गूढ, भयावह आणि अत्यंत शक्तिशाली असा आहे. व्हीलचेअरवर बसलेला आणि सायबरनेटिक आर्म्सने सज्ज असा त्यांचा पोस्टर लूक प्रेक्षकांना रोमांचित करणारा आहे.

‘वाराणसी’ हा राजामौलींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी एक ठरणार आहे. अंदाजे 1000 कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या या चित्रपटात मिथॉलॉजी, अॅडव्हेंचर आणि सायन्स-फिक्शनचा अद्वितीय संगम पाहायला मिळणार आहे. टायटल टीजरनेही हेच संकेत दिले असून, भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवे जागतिक पातळीवरील महाकाव्य मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News