बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोपरा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यात दिसलेल्या प्रियंकाच्या रौद्र आणि अनोख्या लूकने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली. या पोस्टरला आता प्रियंकाचे पती आणि हॉलीवूड सिंगर निक जोनस यांनी खास रिअॅक्शन दिलं असून त्यांची ही पोस्ट चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल होत आहे.
निक जोनसचा पोस्टरवर उत्साही प्रतिसाद
निक जोनस यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर ‘वाराणसी’चा पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की, “वाराणसीच्या शानदार टीमचे अभिनंदन! मला खात्री आहे की ही फिल्म प्रेक्षकांना खूप आवडेल आणि दमदार कामगिरी करेल.” निकच्या या कमेंटमुळे फॅन्सची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर प्रियंका आणि चित्रपटाबद्दल नवे चर्चाविषय सुरू झाले आहेत.

महेश बाबूचा दमदार लूक
पहिल्या पोस्टरमध्ये महेश बाबू नंदीवर बसलेले दिसत आहेत. हातात त्रिशूल, सभोवताली जंगल, वन्यप्राणी आणि रहस्यमय गुहा हा संपूर्ण सेटअप पाहून प्रेक्षक म्हणू लागले की राजामौली पुन्हा एकदा ऐतिहासिक-पौराणिक विश्वावर मोठं सिनेमॅटिक धमाका घेऊन येत आहेत. महेश बाबूचा हा अवतार चाहत्यांना प्रचंड भुरळ घालत आहे.
प्रियंकाच्या लूकने उडवली खळबळ
या चित्रपटातील प्रियंकाचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी समोर आला होता ज्यात ती पिवळ्या साडीत बंदूक हातात घेऊन गंभीर नजरेनं उभी असलेली दिसत होती. या कणखर आणि वेगळ्या गेटअपने फॅन्स अक्षरशः थक्क झाले. त्यात पृथ्वीराज सुकुमारनचा खतरनाक व्हिलन अवतार हे दोघांचे लूक पाहून चित्रपटाची कथा अधिकच रोचक असणार, असा अंदाज प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
मेकर्सनी गुप्त ठेवलं होतं टायटल
मेकर्सनी बराच काळ या चित्रपटाचं नाव गुप्त ठेवलं होतं. अखेर रविवारी झालेल्या टीजर लॉन्च इव्हेंटमध्ये ‘वाराणसी’ हे टायटल जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांचा झणझणीत पाऊस सुरू झाला. ‘वाराणसी’चा पोस्टर, प्रियंकाचा दमदार गेटअप आणि त्यावर निक जोनसची सकारात्मक प्रतिक्रिया या तिहेरी कॉम्बिनेशनमुळे या भव्य चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. फॅन्सचं म्हणणं एकच“ही फिल्म थिएटरमध्ये पाहायलाच हवी!”











