Marathwada Railway Project : मराठवाड्याला मंजूर झाला नवा रेल्वे प्रकल्प; या जिल्ह्यांना होणार फायदा

केंद्रातील मोदी सरकारकडून छत्रपती संभाजीनगर ते परभणी या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याच्या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला 2,179 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

Marathwada Railway Project : मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट झाला आहे. अनेक मार्गावर नवनवीन रेल्वे ट्रेन धावत आहेत. जिथे जास्त गर्दी आहे अशा मार्गांवर रेल्वे कडून अनेकदा विशेष गाड्याही सुरू केल्या जातायत. अशातच आता केंद्र सरकारकडून मराठवाड्याला मोठं गिफ्ट मिळाले आहे. केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. यामुळे मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे.

काय आहे प्रकल्प (Marathwada Railway Project)

केंद्रातील मोदी सरकारकडून छत्रपती संभाजीनगर ते परभणी या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याच्या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला 2,179 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग जवळपास 177.79 किमी लांबीचा असून  1 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकार कडून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी जमीन संपादनासाठी प्राथमिक अधिसूचना जारी झाली. जालना उपविभागातील शेतकऱ्यांकडून 21 नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागवण्यात आले आहेत. आता हा रेल्वे प्रकल्प पुढे सरकण्यासाठी जमीन मोजणी, संपादन, मोबदला, वितरण आणि इतर निविदा प्रक्रिया पार पडतील. (Marathwada Railway Project)

काय फायदा होईल

संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणामुळे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रवास अधिक जलद होईल.

मालवाहतुकीसाठी स्वतंत्र ट्रॅक- शेतमाल आणि औद्योगिक माल वाहतुकीला गती मिळेल.

आणखी एक फायदा म्हणजे नागपूर–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला थेट फायदा होईल

या दुहेरीकरण प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड–नांदेड रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाला चालना मिळेल.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News