Maharashtra Politics : महाराष्ट्रात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे सत्तेतील एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांनी दांडी मारल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले. त्यातच आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा दावा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटातील 20 आमदार 8 महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार होते. मात्र नंतर त्यांचे पॅचअप झालं असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?? Maharashtra Politics
चंद्रकांत खैरे यांनी म्हटल, एकनाथ शिंदे यांचे आमदार आठ नऊ महिन्यापूर्वीच उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली फुटले होते. मात्र त्यावेळी त्यांनी पॅचअप केलं. पण त्यांच्यामध्ये अजूनही खदखद आहे. जेव्हा त्यांना वाटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्याला निधी देत नाहीत, तो राग आणि रोष वाढल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मंत्री गडबड करायला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी टिकणार नाहीत आणि बाहेर पडतील किंवा त्यांना बाहेर जावे लागेल. Maharashtra Politics

परमेश्वर आता सगळं उलटं करतो
देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला, आमदाराला किंवा मंत्र्यांना एकही पैसा किंवा जबाबदारी देणार नाहीत. आता त्यांचे जे काही भांडण सुरू आहे हा सगळा नियतीचा खेळ आहे. खर तर उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना फ्रीहँड देऊन देखील त्यांनी उद्धव साहेबांना सोडलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी पक्ष फोडला त्यामुळे आता परमेश्वर उलट करत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते चुकीचे नाही तर चांगलं काम करत आहेत असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.











