Vivah Panchami 2025 : विवाह पंचमी म्हणजे काय? काय आहे महत्व जाणून घ्या…

हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यातील पाचवी तिथी विवाह पंचमी म्हणून साजरी होते. पुराणांमध्ये याच दिवशी प्रभू श्री राम यांचा माता सीतेशी विवाह झाला होता असे मानले जाते.

विवाह पंचमी हा भगवान श्रीराम आणि माता सीतेच्या विवाह सोहळ्याच्या स्मरणार्थ साजरा होणारा हिंदू सण आहे, जो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येतो. या दिवशी घरोघरी आणि मंदिरात भगवान राम आणि सीतेची विशेष पूजा केली जाते. या पूजेमुळे वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते.

विवाह पंचमी म्हणजे काय? 

विवाह पंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भगवान राम आणि देवी सीता यांच्या आदर्श विवाहित जीवनाचे प्रतीक आहे. रामायणात उल्लेख केल्याप्रमाणे, या दिवशी त्यांचा विवाह झाला होता असे मानले जाते. हा दिवस भगवान राम आणि सीतेच्या भक्तीसाठी आणि वैवाहिक जीवनातील सुख-समृद्धीसाठी खूप शुभ मानला जातो. परंतु, या दिवशी नवीन लग्न करणे टाळले जाते, कारण हा दिवस प्रभू राम आणि सीतेच्या विवाहाला समर्पित आहे. या दिवशी घरोघरी आणि मंदिरात विशेष पूजा-अर्चा केली जाते. या दिवशी काही उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात असेही मानले जाते.

विवाह पंचमीचं महत्व

हिंदू कॅलेंडरनुसार विवाह पंचमी हा सण मार्गर्शिष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. म्हणूनच या दिवशी माता सीता आणि श्री राम यांची पूजा केली जाते. या दिवशी पूजाविधी केल्याने वैवाहिक जीवनात आनंदच प्राप्त होतो, असे मानले जाते. यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीपासून सुटका मिळते. खासकरुन अयोध्येत ही विवाह पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News