Crime News: धक्कादायक! पुण्यात 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; शेजाऱ्यानेच केला घात!

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील संतापजनक घटना घडली आहे. शेजाऱ्यानेच घात करून एका 7 वर्षीय चिमुकलीच्या अब्रुचे अक्षरशः लचके तोडले आहे.

लहान मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटना हा समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषय बनला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर, सामाजिक असुरक्षितता, नैतिक मूल्यांतील अधोगती, पालकांचे कमी लक्ष आणि कायद्याविषयी भीतीचा अभाव यामुळे या घटना सातत्याने वाढताना दिसतात. घर, शाळा, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींमधूनही धोका वाढत असल्याने परिस्थिती अधिकच भयावह होत आहे. पुण्यातील अशाच एका धक्कादायक घटनेचा आता उलगडा झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात आता आणखी सखोल अशा स्वरूपाचा तपास खरंतर सुरू करण्यात आला आहे.

7 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना आणखी अशाच एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील संतापजनक घटना घडली आहे. शेजाऱ्यानेच घात करून एका 7 वर्षीय चिमुकलीच्या अब्रुचे अक्षरशः लचके तोडले आहे.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेले असतानाच पुणे जिल्ह्यातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे शेजाऱ्यानेच घात करून एका 7 वर्षीय चिमुकलीच्या अब्रुचे अक्षरशः लचके तोडले आहे. देविदास रोहिदास गर्जे (रा.नेतवड,ता.जुन्नर) असे नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी ऊसतोड कामगार असल्याचे समजते. पीडित अल्पवयीन मुलीला पुणे येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

नराधम आरोपी पोलिसांच्या अटकेत

पीडित चिमुकली वेदनेने विव्हळत असलाना आईनं तिला विश्वासात घेऊन विचारलं असता तिनं आपबिती सांगितली. इतकंच नाही तर नराधमाचंही नाव सांगितलं. हे ऐकून पीडितेच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पोलिस स्टेशन गाठलं आणि आपल्या मुलीसोबत झालेल्या प्रकाराबाबत सांगितलं. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता आरोपीला अटक केली. नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला पुणे येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे हे करत आहेत.

About Author

Rohit Shinde

Other Latest News