Malegaon Rape Case: मालेगाव रेप केसमध्ये चिमुरडीच्या आईनेचे केला धक्कादायक खुलासा, म्हणाली….

मालेगावच्या डोंगराळेमधील बलात्कार प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र् सुन्न झालेला आहे. अशा परिस्थितीत मृत चिमुरडीच्या आईकडून आता धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गावातील साडे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. १६ नोव्हेंबर रोजी चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती, त्यावेळी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले. नराधमाने तिला एका टॉवरजवळ नेले, तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केली. पोलिसांच्या शोधमोहिमेत आरोपीही होता, त्यावेळी तपास सुरू असताना गावातील एका माहिलेने नराधमासोबत चिमुकलीला टॉवरकडे जाताना पाहिले होते. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. काल मोठे आंदोलन झाल्याचेही पाहायला मिळाले, मात्र आता संबंधित चिमुरडीच्या आईनेचे या प्रकरणावर धक्कादायक खुलासे केले आहेत.

चिमुरडीच्या आईनेचे केला धक्कादायक खुलासा, म्हणाली….

चिमुकलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, चिमुकली घराच्या अंगणात खेळात होती. तुला कॅडबरी देतो, असं सांगून नराधम विजय खैरनार तिला घेऊन गेला. पुढे तिला एका दुकानावर त्याने तिला कॅडबरी घेऊन दिली आणि नंतर टॉवरजवळच्या झुडुपात नेऊन तिच्या अब्रुचे लचके तोडले. अत्याचारांतर नराधम तिथंच थांबला नाही तर त्यानं हे पाप लपवण्यासाठी तिची दगडाने ठेचून ठेचून तिची निर्घृण हत्या केली. तिचा मृतदेह त्याच झुडुपात तसाच फेकून दिला आणि तो गावात घरी निघून गेला.
बराच वेळ झाला…चिमुरडी कुठे दिसत नाही म्हणून आईनं तिचा शोधाशोध सुरू केला. गावकरी आणि तिच्या आई-वडिलांनी मिळून आख्ख गाव पिंजून काढण्यात आलं. पण चिमुरडीचा काही पत्ता लागला नाही. तिच्यासोबत खेळत असलेल्या बारक्या मुलांनी नराधमाला तिला कॅडबरी देतो म्हणून घेऊन गेल्याच सांगितलं. त्या चिमुरडीच्या पालकांनी लगेचच त्याच्या घरी जाऊन विचारणा केली. मी तिला कॅडबरी देऊन दुकानाच्या इथेच सोडल्याचं त्या नराधमाने सांगितलं. त्यानं स्वतः तिची हत्या केली तरीही त्याने त्या शोधात सहभागी होऊन तिला शोधण्याचं ढोंग केलं..
तिचा फोटो तिच्या घरच्यांकडून मागून घेतला. पोलिसांच्या तपासाला देखील तो योग्य पद्धतीने सहकार्य करत तिला शोधण्याचं नाटक करत होता. पण लहान मुलांच्या जबाबावरून आणि तिच्यासोबत आरोपीलाच शेवटचं पाहिलं असल्याचं समोर आलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच सर्व प्रकरण उघडकीस आलं. म्हणजे त्या चिमुरडीला दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करून देखील नराधम हा चिमुकलीचा शोध घेत होता.

शुक्रवारी मालेगावात पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष

शुक्रवारी स्थानिक न्यायालय परिसरात नागरिकांचा आक्रोश पुन्हा उफाळून आला. सकाळपासून मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी आणि तरुणांनी थेट आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करत न्यायालयाच्या दिशेने धाव घेतली. वाढता तणाव पाहून पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतानाही आंदोलनकर्त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी न्यायालयाच्या लोखंडी गेटला जोरदार धक्का देत प्रवेशद्वार उद्ध्वस्त केले. काहीजण आवारात घुसण्यातही यशस्वी झाले. त्यामुळे एकूणच शुक्रवारी मालेगावात पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष उभा राहिल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News