सोन्यातील गुंतवणूक ही शतकानुशतके सुरक्षित मानली जाते. आर्थिक मंदी, महागाई किंवा बाजारातील चढ-उतार यांच्या काळात सोन्याची किंमत तुलनेने स्थिर राहते. त्यामुळे भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक लोक सोने हा उत्तम पर्याय मानतात. सोन्यातील गुंतवणूक विविध स्वरूपात करता येते. दागिने, नाणी, बार, गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड इत्यादी. भविष्यातील आर्थिक सुरक्षितता आणि संपत्तीची जपणूक करण्यासाठी सोने आजही सर्वाधिक पसंतीचा सुरक्षित पर्याय ठरतो. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातील सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत सोने खरेदी अथवा सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना माघार घ्यावी लागत आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? भारताच्या शेजारील एका राष्ट्रात स्वस्त सोनं मिळतं, आणि तुम्ही तिथे खरेदी देखील करू शकता. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…
शेजारील देश भुतानमध्ये स्वस्त सोनं
भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सोनं हे लोकांच्या आवाकाबाहेर गेलं आहे. त्यामुळे लोक आता वेगवेगळ्या देशातून सोनं आणू शकतो का? अशा विचारात आहेत. कमी किंमतीत सोनं आणायचं झालं तर लोकांना सर्वात आधी आठवतो तो दुबई. पण तुम्हाला माहितीय का की भारताच्या शेजारी असा एक देश आहे जिथे सोनं खूप स्वस्त आहे? आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल आणि हा देश कोणता असा प्रश्न पडेल. संपूर्ण जगात, भारताचा पूर्वेकडील शेजारी देश भूतान येथे सोनं सर्वात स्वस्त दरात मिळतं. भूतानमध्ये सोन्याची किंमत कमी असण्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत, ज्यामुळे ते एक अद्वितीय बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.

सोनं इतकं स्वस्त नेमकं कशामुळे ?
कमी कर आणि शुल्क हे कमी किंमती असण्याचे प्रमुख कारण मानले जाते. भूतान सरकारने सोन्याच्या आयातीवर अतिशय कमी आयात शुल्क लावले आहे. याशिवाय, सोन्याच्या विक्रीवर भूतानमध्ये कोणताही कर लागत नाही. भूतान सरकारचा उद्देश आहे की पर्यटकांना आकर्षक किमतीत सोनं उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून देशाला भेट देणाऱ्या पर्यटनाला चालना मिळेल.
भूतानला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना शुल्क-मुक्त सोन्याची खरेदी करण्याची परवानगी आहे. हा विशेष नियम भूतान सरकारने देशात पर्यटन वाढवण्यासाठी केलेली एक योजना आहे. किंमत कमी असली तरी याचा अर्थ असा नाही की सोन्याची शुद्धता कमी आहे. भूतानमध्ये विकले जाणारे सोने देखील आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उच्च प्रतीचे असते. करांमध्ये झालेले तात्पुरते बदल किंवा चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतार यामुळे दुबई, हाँगकाँग किंवा स्वित्झर्लंडसारखे देशही तात्पुरत्या कालावधीसाठी स्वस्त सोन्यासाठी ओळखले जातात, परंतु भूतानचे कमी-शुल्क मॉडेल हे एक स्थिर कारण आहे.
परदेशातून सोने आणण्याची मर्यादा
प्रवासी जर परदेशात किमान 6 महिने राहिला असेल तर तो कमाल 1 किलो सोने भारतात आणू शकतो, परंतु त्यावर शुल्क भरावे लागते आणि योग्य ते कागदपत्र आवश्यक असतात. त्यामुळे भूतानमधून सोने घेऊन येताना नियम पाळणे, बिल आणि मालमत्तेची घोषणा करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याबाबत सरकारी संकेतस्थळावरून अधिक माहिती जाणून घ्यावी. तानसह कोणत्याही परदेशातून भारतात सोने आणण्यास ठराविक मर्यादा लागू होतात. शुल्कमुक्त (ड्युटी-फ्री) सोने पुरुषांना कमाल 20 ग्रॅम आणि महिलांना 40 ग्रॅमपर्यंतच परवानगी आहे. बदलत्या दरांनुसार हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.











