पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उलट परिस्थिती समोर आल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. चक्क एका महिलेने गुंगी आणणारे औषध देऊन पुरुषावर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप कोथरूड पोलिसांकडे करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.चंदगड तालुक्यातील ४७ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरण नेमकं काय ?
पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, पीडित पुरुष हा ४७ वर्षांचा आहे. तो मुळचा कोल्हापूर येथील चंदगडमध्ये राहणारा आहे. पीडित इसमाला दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. आरोपी गौरी ही पुण्यातील राहणारी आहे. पीडित तरुणाची ओळख तुळजापूर येथे देवदर्शनादरम्यान आरोपी महिलेशी झाली. सुरुवातीला ‘भाऊ’ म्हणून तिने पीडित तरुणाच्या कुटुंबाशीही जवळीक वाढवली. पुढे वारंवार संपर्क साधत ती त्यांच्या घरात येऊन राहू लागली.

रात राहत असताना त्या महिलेकडून पीडिताशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यास विरोध केल्यानंतर पीडिताने तिला घर सोडण्यास सांगितले. नंतर माफी मागत ती महिलेला चंदगडसाठी निघाली मात्र बसस्थानकात आल्यानंतर सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाला म्हणाली की मला वॉशरुमला जायचे आहे. तसेच मी उघड्यावर जात नाही म्हणत ती एका लॉजवर गेली आणि तरुणालाही आत बोलावून स्वतःला उच्च न्यायालयातील वकील असल्याचे सांगत तुम्हाला मदत करेन तुमच्या मुलाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नोकरीला लावले असे सांगत त्याच्यावर मानसिक दबाव टाकला मात्र तो रागाने निघून गेला.
काही दिवसांनी पुन्हा तिने पीडिताच्या पत्नीला फोन करून त्याला ‘काशी दर्शनासाठी भाऊ म्हणून’ सोबत घेऊन जाते असे सांगून त्याला २५ फेब्रुवारी रोजी पुण्यात बोलावले. तक्रारीनुसार, कोथरूडमधील तिच्या घरी तरुणाला काहीतरी प्यायला दिले त्यानंतर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. विरोध केल्यावर धमकी देण्यात आली मी म्हणेल तसेच करायचे नाहीतर इथेच काहीतरी करेन असे तक्रारीत म्हटले आहे.
पुढे मला काशीला नेले त्यांनतर काशीत तीन दिवस बळजबरीने ठेवत शरीरसंबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडिताने केला आहे. पत्नीशी संपर्क झाल्यानंतर तिने या महिलेला फोनवर सुनावले, त्यानंतर काही दिवस फोन आला नाही मात्र त्यानंतर आरोपी महिलेकडून दोन लाख रुपयांची मागणी व फोटो व्हायरल करण्याची धमकी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोथरूड परिसरात आणि शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
महिला सराईत गुन्हेगार ?
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याकडे काल एक तक्रार आली होती. या महिले विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला आणि फिर्यादी इसमाची तुळजापूर देवी मंदिरात ओळख झाली. ५ महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात ही घटना घडली होती. मार्च महिन्यात फिर्यादी आणि आरोपीचं काही साथीदार हे तुळजापूरला फिरायला गेले होते. त्यानंतर काशी विश्वनाथ इथं गेले होते. ओळखीचा फायदा घेत काशी विश्वनाथ इथं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा माझा भाऊ आहे हे सांगत काही देवाण घेवाण झाल्याची पण माहिती आहे.
या महिलेवर एक अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती समोर आली आहे. काल गुन्हा दाखल झाला असून आरोपीला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवलं आहे, अशी माहिती दिली. या घटनेमुळे पैशांसाठी नाती-गोती आणि घसरत झालेली संस्कारांची जपणूक या बाबी अधोरेखित होतात. पोलिसांकडून या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. आता आगामी काळात संबंभित महिलेवर अटकेची कारवाई होते की नाही, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











