शिवसेना आमदार संतोष बांगर हे राज्याच्या राजकारणातील सक्रीय आणि भाषणशैलीमुळे ओळखले जाणारे नेते आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धती, आक्रमक भूमिका आणि काही सार्वजनिक वक्तव्यांमुळे त्यांची प्रतिमा अनेकदा चर्चेत येत असते. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर ते थेट भूमिका घेतात, ज्यामुळे ते समर्थकांमध्ये लोकप्रिय असले तरी विरोधकांकडून त्यांच्यावर टीकाही केली जाते. राजकीय घडामोडी, पक्षांतराच्या चर्चा आणि विविध कार्यक्रमांतील सहभागामुळे ते सतत बातम्यांमध्ये राहतात. अशा संपूर्ण परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून ते काही वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. भाजप आमदार तान्हाजी मुटकूळे सातत्याने आमदार बांगर यांच्यावर गंभीर अशा स्वरूपाचे आरोप करताना दिसत आहेत. आता त्यांनी आणखी एक दावा केला आहे.
“संतोष बांगरांचे महिलांसोबत अनैतिक संबंध…”
आमदार मुटकुळे यांनी पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केला. आमदार बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. मागे जायभाय नावाच्या एका व्यक्तीने आत्महत्या केली, मतदारसंघातील अनेक महिलांसोबत बांगर यांचे अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला. मागील बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.

भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. आमदार बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 खोके घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मागे आमदार संतोष बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 खोके घेतल्याचा आरोप देखील आमदार मुटकुळे त्यांनी केला होता.
आमदार तान्हाजी मुटकूळेंचा दावा काय ?
आमदार तान्हाजी मुटकूळे आमदार बांगरांवर गंभीर अशा स्वरूपाचे आरोप करताना म्हणातात की, “कळमनुरीत आपण काय करतो, तिथल्या किती लोकांशी अनैतिक संबंध ठेवतो, हे तपासलं पाहिजे. या सगळ्याचे आपल्याकडे रेकॉर्ड आहेत. असा खळबळजनक दावा करत आमदार मुटकुळे यांनी आमदार बांगर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमदार बांगर यांचे अनेक महिलांसोबत असणारे अनैतिक संबंध आणि जायभाय नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.” त्यामुळे एकूणच आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण आरोपांवर आता खुद्द आमदार संतोष बांगल नेमकी काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











