मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं युतीचं ठरलं ? महाराष्ट्रातील ‘या’ 6 महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता

‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा यावर्षी मे महिन्यात उद्धव ठाकरे यांनी वरळी डोममध्ये केली होती. त्यानंतर राज आणि उद्धव यांच्या भेटी वाढत गेल्या आणि या दोन्ही पक्षात राजकीय युती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मनसे महाविकास आघाडीत सामील होणार की स्वतंत्र रस्ता निवडणार, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र, महाविकास आघाडीला बाजूला ठेवून राज–उद्धव एकत्र आले, तर राज्याच्या आगामी राजकारणात नवा सस्पेन्स तयार होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत असताना या दोन नेत्यांची एकत्र येणारी राजकीय हालचाल खूप महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील 6 महापालिका एकत्र लढणार?

माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल 27 नोव्हेंबर रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आता एक मोठी बातमी खरंतर समोर येत आहे. राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट राज्यातील सहा महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. मुंबई महापालिकेसह कल्याण-डोंबिवली,  नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोणत्या 6 महापालिका एकत्र लढणार ?

  1. बृहन्मुंबई महानगरपालिका
  2. ठाणे महानगरपालिका
  3. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
  4. नवी मुंबई महानगरपालिका
  5. पुणे महानगरपालिका
  6. नाशिक महानगरपालिका

‘एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी’-ठाकरे

‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा यावर्षी मे महिन्यात उद्धव ठाकरे यांनी वरळी डोममध्ये केली होती. त्यानंतर राज आणि उद्धव यांच्या भेटी वाढत गेल्या आणि या दोन्ही पक्षात राजकीय युती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यामंध्ये भेट झाल्याचे समजते. महापालिकेतील जागावाटपाच्या सूत्राबाबतही चर्चा झाल्याचे समजते. यावेळी उबाठा पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते. मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. तसंच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News