IAS राजेश अग्रवाल होणार महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव; ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेत उल्लेखनीय कार्यामुळे ओळख

राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अगरवाल यांच्या खांद्यावर येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अगरवाल यांच्या खांद्यावर येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अगरवाल हे मुख्य सचिव असतील. राजेश अगरवाल हे 1989 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या आधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी होती. या आधी 30 जून 2025 रोजी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची कारकीर्द आता 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर मुख्य सचिवपदाचा पदभार हा राजेश अगरवाल यांच्याकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

राजेश अग्रवाल यांच्यावर मोठी जबाबदारी

अग्रवाल पुढील आठवड्यात महाराष्ट्र शासनात रुजू होणार असून, त्यांचा निवृत्तीचा कालावधी नोव्हेंबर 2026 मध्ये आहे. ते मुख्य सचिव झाल्यानंतर 1989, 1990 आणि 1991 बॅचमधील काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना राज्य प्रशासनाचे सर्वोच्च पद मिळण्याची संधी गमवावी लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राजेश कुमार हे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी असून, त्यांना ३० ऑगस्टला निवृत्त व्हायचे होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवण्यात आला होता. तो नोव्हेंबरअखेर संपणार आहे. कुमार यांनी या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारला होता.

आयएएस राजेश अग्रवाल नेमके कोण ?

राजेश अग्रवाल हे १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते जवळपास एक दशकापासून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी वित्तीय सेवा, आदिवासी व्यवहार, कौशल्य विकास, पेट्रोलियम आणि सामाजिक कल्याण या महत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाराष्ट्रात त्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले असून, माहिती तंत्रज्ञान, लेखा आणि कोषागार विभागांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. द्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याचे मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राजेश अग्रवाल यांनी केंद्रीय पातळीवर आपल्या कामाचा दिमाखदार ठसा उमटवला. त्याचीच दखल घेऊन दिग्गजांना बाजूला सारून राज्य सरकारने त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. पुढच्या दोन दिवसात त्यांनी कार्यभार स्वीकारावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News