Gita Jayanti 2025 : कधी आहे गीता जयंती? महत्व आणि पूजा पद्धत जाणून घ्या

गीता जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला (मोक्षदा एकादशी) साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. यावर्षी गीता जयंती कधी आहे? महत्व आणि पूजा पद्धत जाणून घेऊयात…

गीता जयंतीचे महत्व

गीता जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला (मोक्षदा एकादशी) साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.  या दिवशी भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी भगवद्गीतेचे पठण केल्याने पुण्यप्राप्ती होते. 

कधी आहे गीता जयंती ?

एकादशी तिथी रविवार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. आणि सोमवारी, 1 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 02 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार सोमवारी, 1 डिसेंबर 2025 रोजी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जाईल.

गीता जयंतीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत

  • सकाळी लवकर उठून स्नान करा.
  • देव्हारा स्वच्छ करुन घ्या.
  • भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा.
  • भगवान श्रीकृष्णासमोर तुपाचा दिवा लावा.
  • फळे, फुले, धूप, तुळशीची पाने अर्पण करा.
  • श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करा किंवा ऐका.
  • भगवान श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करा.
  • गरजूंना अन्नदान करा आणि दानधर्म करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News