शनिवार हा शनिदेवाला समर्पित असून, या दिवशी मंत्रांचा जप केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात. शनिदेवाच्या उपासनेसाठी शनिवार हा शुभ दिवस मानला जातो. शनि महामंत्रांचा जप केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी मंत्रांचा जप करू शकता.
शनि महामंत्र
- बीज मंत्र : ‘ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।’
- मूळ मंत्र : ‘ॐ शं शनैश्चराय नमः।’
- स्तोत्र : ‘ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥’
या शनि महामंत्राचा जप करून शनिदेवाला प्रसन्न करता येते.

मंत्राचा अर्थ
शनि महामंत्र ‘ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥’ या मंत्राचा अर्थ आहे..ज्यांचे स्वरूप निळ्या रंगासारखे आहे, जे सूर्यपुत्र आणि यमाचे मोठे भाऊ आहेत, तसेच जे छाया आणि सूर्य यांच्यापासून जन्माला आले आहेत, त्या शनि महाराजांना मी वंदन करतो. या मंत्राच्या जपाने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि साडेसातीचा दोष दूर होतो.
- ॐ नीलांजन समाभासं: ज्यांचे रूप निळ्या आकाशासारखे आहे.
- रविपुत्रं: सूर्यपुत्र.
- यमाग्रजम्: यमाचे मोठे भाऊ.
- छायामार्तण्डसम्भूतं: छाया आणि सूर्य यांच्यापासून जन्माला आलेले.
- तं नमामि शनैश्चरम्: अशा शनिदेवाला मी वंदन करतो.
शनि महामंत्राचा जप कसा करावा
- शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी, स्वच्छ ठिकाणी बसून जप करा.
- शनिदेवाच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसा.
- रुद्राक्षाची माळ घेऊन, ‘ॐ निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
- मंत्राचा जप करताना तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि भक्तीमय ठेवा.
- शनिवारी हनुमान चालीसा पठण करणे, गूळ आणि चणे वाटणे किंवा पिंपळाच्या झाडाची पूजा करणे यासारखे उपाय देखील शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











