Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये भेटणार?? सरकारची मोठी घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी आणखी भर देण्यात येणार आहे . महिला बचत गटांना थेटे एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लघुउद्योग सूक्ष्म व्यवसाय आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी महायुती सरकारने 2024 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.  या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये सरकार कडून जमा केले जातात. काहीही काम न करता 1500 रुपये मिळत असल्याने महिलावर्गातही आनंदाचे वातावरण आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

लाडक्या बहिणींना १ लाख रुपयांचे अनुदान (Ladki Bahin Yojana)

राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका चालू असल्यामुळे अनेक नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगस येथील जाहीर सभेत लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी आणखी भर देण्यात येणार आहे . महिला बचत गटांना थेटे एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लघुउद्योग सूक्ष्म व्यवसाय आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय शेतकऱ्यांची वीजबिल माफी आणि सूर्यघर योजनेतून मोफत वीज देण्याचा संकल्प बोलून दाखवला.

नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार

दरम्यान, आज महिन्याची शेवटची तारीख असतानाही नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार याची वाट महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी बघत आहेत. परंतु राज्यामध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकारला कुठलाही असा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे दोन तारखेला निवडणूक मतदान आणि 3 तारखेला निकाल लागल्यानंतरच महिलांच्या खात्यावर लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News