एक धक्कादायक अशी घटना खरंतर नांदेडमधून समोर आली आहे. नांदेड शहरात एका घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मुलीने मुलाच्या घरी जाऊन तिच्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून सर्वांना धक्का दिला. नांदेडच्या इतवारा परिसरात ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नांदेडमध्ये नेमकं काय घडलं ?
प्रेमसंबंधाला विरोध असल्याने मुलीच्या वडील आणि भावाने मिळून तरुणांची हत्या केल्याची घटना नांदेड मध्ये घडली. प्रियकराची हत्या झाल्यानंतर प्रेयसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना घटना नांदेड येथे घडली आहे. सक्षम ताटे (20 वर्षे, रा. मच्छी मार्केट) याची हत्त्या त्याची प्रेयसी आंचल मामिडवार हिचे वडील आणि भावाने मिळून केली होती. गुरूवारी संध्याकाळी या दोघांनी सक्षमचा खून केला होता. आंचलचे त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध पसंत नसल्याने या दोघांनी सक्षमला ठार मारण्याचं ठरवलं होतं. सक्षमचा मृतदेह जेव्हा घरी पोहोचला तेव्हा आंचलने त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून आंचलने जी प्रतिक्रिया दिलीय ती अत्यंत हृदयद्रावक आहे.












