बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. उपकर्णधार शुभमन गिल संघात परतला आहे. मानेला झालेल्या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग नव्हता. संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका ९ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.
१५ सदस्यीय भारतीय संघाची
९ डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवडकर्त्यांनी २०२५ च्या आशिया कपमध्ये खेळलेल्या संघाचीच निवड केली आहे. वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे चार फिरकी गोलंदाज आहेत. १५ सदस्यीय संघात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे तीन वेगवान गोलंदाज आहेत.

फलंदाजीत कर्णधार सूर्यकुमार यादव, उपकर्णधार शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. जितेश आणि सॅमसन हे दोन यष्टिरक्षक आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटक येथे खेळला जाईल. दुसरा टी-२० सामना ११ डिसेंबर रोजी न्यू चंदीगड येथे आणि तिसरा टी-२० सामना १४ डिसेंबर रोजी धर्मशाळा येथे खेळला जाईल. चौथा टी-२० सामना १७ डिसेंबर रोजी लखनौ येथे आणि शेवटचा आणि पाचवा टी-२० सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल.











