Cow Milk Production । गायीच्या दुधाच्या उत्पादनात भारताने अमेरिकेला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जागतिक पटलावर भारताने गायीच्या दूध उत्पादनात आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन (IDF) च्या अहवालानुसार, भारत सर्वाधिक गायीचे दूध उत्पादन करतो. अमेरिका आणि चीन सारख्या जगातील महाशक्तीला मागे टाकत भारत आता गाईच्या दूध उत्पदनात जगातील टॉपचा देश बनला आहे.
गायीच्या दुधाचा महत्त्वपूर्ण वाटा (Cow Milk Production)
अलीकडेच, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने दूध, मांस आणि अंडी उत्पादनाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, २०२५ पर्यंत गायीचे दूध उत्पादन १३० दशलक्ष टनांपेक्षा (Cow Milk Production) जास्त होण्याचा अंदाज आहे. एकूण दूध उत्पादनात गायीच्या दुधाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. २०२३ नंतर पुन्हा एकदा भारत जागतिक स्तरावर सर्वाधिक गायीचे दूध उत्पादन करेल. जगातील इतर प्रमुख देश भारतापेक्षा फक्त मागेच नव्हे तर त्यांच्या देशातील गायीच्या दुधाच्या उत्पादनात सातत्याने घट होताना दिसत आहे. त्यामुळं भारताचे पहिले स्थान कायम राहण्याची शक्यता आहे.

आकडेवारीनुसार गायीच्या दुधाचे उत्पादन (Cow Milk Production)
२०२४-२५ मध्ये देशातील एकूण दूध उत्पादन २४८ दशलक्ष टन .
सर्व जातींमध्ये एकूण गायींचे दूध उत्पादन ५३.६० टक्के आहे.
सर्व जातींमध्ये एकूण म्हशींचे दूध उत्पादन ४३.१५ टक्के आहे.
संकरित गायींपासून दूध उत्पादन ३०.८० टक्के आहे.
देशी जातींपासून दूध उत्पादन ११.२० टक्के आहे.
परदेशी जातींपासून दूध उत्पादन १.८९ टक्के आहे.
नॉनडिस्क्रिप्ट जातींपासून दूध उत्पादन ९.६४ टक्के आहे.
२०२३ मध्ये भारतात गायीचे दूध उत्पादन १२९ दशलक्ष टन होते. परंतु, युरोपियन युनियनमध्ये गायीचे दूध उत्पादन १५४ दशलक्ष टन आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देश असल्याने, भारताला गायीच्या दुधाचा प्रमुख उत्पादक म्हणून पाहिले जाते. अमेरिकेत, हा आकडा १०० दशलक्ष टन आहे, तर चीन ४.२ दशलक्ष टन दूध उत्पादन करतो. बेलारूस आणि पाकिस्तानमध्ये दूध उत्पादनाचे आकडे कमी आहेत, परंतु त्यांचा विकास दर वेगाने वाढत आहे. बांगलादेशचा विकास दर भारताच्या ७.४ पेक्षाही जास्त म्हणजेच ७.६ आहे.











