Raveena Tandon : रवीना टंडनच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; विमानतळावर काय केले पहाच

रवीना टंडन (Raveena Tandon) मुंबई एअरपोर्टवरून बाहेर पडत होत्या. तेवढ्यात त्यांच्या समोर जमिनीवर पॉलिथिन पडलेले दिसले. अनेकदा अशा गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात, पण रवीनाने थांबून ती पॉलिथिन स्वतः उचलली.

Raveena Tandon : बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सदाबहार अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकदा सामाजिक प्रश्नांवर स्वतःची भूमिका मांडणारी रवीना यावेळी एका साध्या कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबई एअरपोर्टवरून बाहेर पडताना त्यांनी केलेला स्वच्छतेचा संदेश देणारा उपक्रम सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एअरपोर्टवर पॉलिथिन पाहताच रवीना पुढे सरसावल्या

घटनेनुसार, रवीना टंडन (Raveena Tandon) मुंबई एअरपोर्टवरून बाहेर पडत होत्या. तेवढ्यात त्यांच्या समोर जमिनीवर पॉलिथिन पडलेले दिसले. अनेकदा अशा गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात, पण रवीनाने थांबून ती पॉलिथिन स्वतः उचलली. त्यांच्या मागे चालणाऱ्या त्यांच्या टीममधील व्यक्तीने तत्काळ ते पिशवीसदृश कचरा त्यांच्या हातातून घेतला. रवीना यांनी त्याला शांतपणे इशाऱ्यानेच ते जवळच्या डस्टबिनमध्ये टाकण्यास सांगितले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ पापाराझीने टिपला आणि तो विरल भैयानी यांच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करताच काही सेकंदांतच सोशल मीडियावर आग फैलावली.

साध्या कृतीतून दिला प्रभावी संदेश (Raveena Tandon)

या व्हिडिओत रवीना लाल रंगाचा कुर्ता आणि पँट्समध्ये खूपच एलिगंट आणि स्टायलिश दिसत आहेत. पण लोकांचे लक्ष त्यांच्या स्टाईलपेक्षा त्यांच्या समाजाभिमुख वर्तणुकीने वेधून घेतले. त्यांनी कोणत्याही गाजावाजाशिवाय दिलेला स्वच्छतेबाबतचा संदेश जवळपास सर्वांनाच भावला.सोशल मीडियावर अनेकांनी लिहिले की, “एक पब्लिक फिगर म्हणून रवीनाने जे केले ते खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारे आहे.” तर एका यूजरने कमेंट केली, “भारताला गंदा करणाऱ्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवं.” आणखी एका कमेंटमध्ये म्हटले आहे, “आपण सगळ्यांनी असं थोडं-थोडं केलं, तरी वातावरण किती स्वच्छ होऊ शकतं, याचा अंदाजही नाही.”

चाहत्यांकडून आणि नेटिझन्सकडून प्रशंसेचा वर्षाव

विरल भैयानी यांनीदेखील या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, “रवीनाने खूप सुंदर पद्धतीने आणि सहजतेने सगळ्यांना सिविक मॅनर्सचा तगडा धडा दिला.” या पोस्टवर हजारो हार्ट आणि टाळ्यांचे इमोजी पडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या सेलिब्रिटींच्या वर्तनावर नेहमीच चर्चा होत असते. पण रवीनाच्या या छोट्याशा कृतीने सेलिब्रिटींनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कसे पुढे आले पाहिजे, याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे.

स्वच्छतेचा संदेश देणारी जबाबदार सेलिब्रिटी

रवीना टंडन नेहमीच सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करत असतात. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेपासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. एअरपोर्टवरील त्यांची ही कृतीही त्याच विचारसरणीचा एक भाग असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. रवीनाने दाखवून दिले की स्वच्छता ही मोठमोठ्या मोहिमा चालवूनच नव्हे, तर छोट्या छोट्या कृतीतूनही सुरू होऊ शकते. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने यात आपला वाटा उचलला पाहिजे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News