महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा; कुठे किती दर मिळाला? जाणून घ्या !

महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसत आहे. दराने 5 हजारांचा टप्पा गाठल्याचे चित्र सर्वत्र साधारणपणे पाहायला मिळत आहे.

राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. दर वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसत आहे. दराने 5 हजारांचा टप्पा गाठल्याचे चित्र सर्वत्र साधारणपणे पाहायला मिळत आहे.

राज्यभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात आज लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात आवक वाढत असतानाही सोयाबीनला अनेक ठिकाणी चांगला दर मिळत आहे. पिवळ्या, पांढऱ्याहायब्रीड आणि स्थानिक अशा सर्व प्रकारच्या सोयाबीनमध्ये मागणीनुसार दरातील फरक स्पष्ट दिसून येत आहे. सोयाबीनच्या दरात अलीकडे झालेल्या सुधारामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात समाधानी आहेत. बाजारातील तेजीमुळे उत्पन्नाला आधार मिळाला असून खर्च भरून निघण्याची शक्यता वाढली आहे. योग्य भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत असून आगामी हंगामाबद्दलही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात सोयाबीनच्या कुठे-काय दर ?

लासलगाव बाजारात 988 क्विंटल आवक नोंदली असून किमान दर 3400 व जास्तीत जास्त 4571 रुपये मिळाले. सरासरी भाव 4490 रुपये नोंदवला गेला. विंचूर उपबाजारातही 4475 चा सरासरी दर मिळून स्थिरता दिसून आली. सिन्नर आणि सिन्नर-हिवरगाव येथे अनुक्रमे 4450 रुपये सरासरी दर राहिला. हिवरगावमध्ये जास्तीत जास्त भाव 4700 पर्यंत पोहोचला, ज्यामुळे या पट्ट्यात दर्जेदार मालाला मागणी असल्याचे स्पष्ट होते.

कारंजा बाजारात तब्बल 3500 क्विंटल आवक व 4575 रुपयेपर्यंत जास्तीत जास्त भावाने खरेदीदारांची स्पर्धा जाणवली. चंद्रपूर येथे सरासरी भाव 4370 रुपये  राहिला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 4415 पर्यंत भाव गेला. या तिन्ही बाजारांत मालाचे योग्य प्रमाण आणि उत्कृष्ट गुणवत्ता असल्याने दर उच्च पातळीवर टिकले.

सर्वाधिक आवक लातूरमध्ये 10,765 क्विंटल इतकी नोंदली गेली. सरासरी भाव 4500 रुपये राहिला. जालना बाजारात मात्र दरांनी विक्रमी उंची गाठली. 5500 रू हा सर्वाधिक आणि सरासरीही याच स्तरावर स्थिर राहिला. हा आजचा राज्यातील सर्वोच्च भाव ठरला. अकोला, यवतमाळ, खामगाव, वाशीम या पट्ट्यांमध्येही पिवळ्या सोयाबीनला 4300 ते 4700 रुपये दरम्यानचे चांगले भाव मिळाले. नागपूर बाजारात केवळ 3 क्विंटल आवक असली तरी भाव 8000 ते 8200 रुपये  eमिळून सर्वांना आश्चर्यचकित केले. अत्यल्प प्रमाणात आलेला उच्च प्रतीचा माल असल्याने हा विक्रमी दर मिळाला.


About Author

Rohit Shinde

Other Latest News