Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग या दिवशी पूर्ण होणार; गडकरींनी सांगितली तारीख

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत नेमका कधी सुरू होणार याकडे कोकणवासीय डोळे लावून बसली आहे. कारण मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या रखडलेल्या महामार्गाचा फटका बसतो

Mumbai Goa Highway : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत नेमका कधी सुरू होणार याकडे कोकणवासीय डोळे लावून बसली आहे. कारण मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या रखडलेल्या महामार्गाचा फटका बसतो. वेळ तर वाया जातोच, परंतु जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतोय ते वेगळच. आतापर्यंत सरकारने आली आणि गेली, परंतु मुंबई गोवा महामार्ग अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे. आता मात्र या महामार्गाबात नवीन अपडेट समोर आली आहे. आज संसदेत मुंबई गोवा महामार्ग बाबत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प पूर्ण कधी होणार याची डेडलाइन दिली आहे.

संसदेत काय घडलं ? Mumbai Goa Highway

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून लोकसभा अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मुंबई- गोवा महामार्गासाठी ‘चांद्रयान मोहिमेपेक्षा जास्त खर्च झाला आहे, तरीही काम अपूर्ण का?’ तुम्ही यात जातीनं लक्ष घाला. तरच काहीतरी होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे त्यामुळं नागरिकही आता वैतागले आहेत. हे काम पूर्ण कधी होणार? असा सवाल करत अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका मांडली.सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याची माहिती दिली. Mumbai Goa Highway

काय म्हणाले नितीन गडकरी ?

मुंबईत गोवा महामार्गाचे काम 2009 मध्ये सुरू झालं आणि मी मंत्री 2014 साली झालो. त्यामुळं जुन्या सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काम दिले होते. यात जमीन संपादनाचा मुख्य अडथळा होता. अनेक कंत्राटदार बदलण्यात आल. अनेकदा कारवाई सुद्धा करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गाचे 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, एप्रिल २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि नागरिकांचा त्रासही संपेल. खूप विलंब झाला हे मान्य करतो, असे गडकरी म्हणाले. त्यामुळं मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आता एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News