FIR Against Ranveer Singh : रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल; देवीची नक्कल भोवली

बेंगळुरू येथील एका वकिलाने रणवीर सिंगविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये आरोप करण्यात आला आहे की या कृतीमुळे तुळु भाषिक समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

FIR Against Ranveer Singh : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोव्यात झालेल्या IFFI 2025 च्या क्लोजिंग सेरेमनीत अभिनेता रणवीर सिंहने कांतारा चॅप्टर १ मधील देवीचा उल्लेख भूत असा केला होता. यानंतर सोशल मीडियावर रणवीर विरुद्ध टीकेची जोड उठली. आता तर याप्रकरणी त्याच्या विरोधात थेट यापायर दाखल करण्यात आली आहे. देवीला भूत असं म्हणून रणवीर सिंगने धार्मिक भावना दुखावल्या आहेत असे या तक्रारीत म्हटले आहे.

कोणी दाखल केली तक्रार? FIR Against Ranveer Singh

IFFI 2025 वेळी कांतारा चॅप्टर १ मधील दैव दृश्याची नक्कल केल्याबद्दल बेंगळुरू येथील एका वकिलाने रणवीर सिंगविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये आरोप करण्यात आला आहे की या कृतीमुळे तुळु भाषिक समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत रणवीरवर जोरदार टीका केली आहे आणि त्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत असे म्हटले आहे. त्यामुळे रणवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. FIR Against Ranveer Singh

रणवीरने कशी नक्कल केली?

गोव्यात झालेल्या IFFI 2025 च्या क्लोजिंग सेरेमनीत अभिनेता रणवीर सिंहने कांतारा चॅप्टर १ चे कौतुक केलं. ऋषभच्या अभिनयाची त्याने भरभरून स्तुती केली. मात्र क्लायमॅक्स सीनची नक्कल करताना त्यांनी देवीला ‘भूत’ असे संबोधल्याने सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात नाराजीची लाट उसळली. रणवीरचे हे वक्तव्य अनेकांना आक्षेपार्ह वाटले. सोशल मीडियावर लोकांनी हे विधान अपमानास्पद असल्याची टीका केली. एका यूजरने लिहिले की एका अभिनेत्याला काय बोलावे हे माहित असणे आवश्यक आहे आणि देवीला ‘भूत’ म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News