Vladimir Putin Religion : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आहेत. दिल्ली विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत रशियन संरक्षणमंत्र्यांसह सात कॅबिनेट मंत्री सुद्धा भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत हा रशियाचा खास मित्र आहे आणि पुतीन हे तब्बल चार वर्षांनी भारतात आले आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरात आज पुतीन या नावाचीच चर्चा सुरू आहे. यास पार्श्वभूमीवर आज आपण व्लादिमीर पुतिन यांचा धर्म कोणता आहे आणि ते कोणत्या चर्चमध्ये जातात ते जाणून घेऊया.
काय आहे पुतीन यांचा धर्म? Vladimir Putin Religion
पुतिन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतात. हा त्यांचा धर्म आहे. पुतिन यांचे पालनपोषण एका धर्मनिष्ठ ख्रिश्चन आईने केले आहे असे म्हटले जाते. म्हणूनच व्लादिमीर पुतिन नेहमीच त्यांच्या गळ्यात क्रॉस घालतात. रशियाला अधिकृतपणे धर्मनिरपेक्ष देश मानले जाते. तरीही, बहुतेक रशियन लोकांप्रमाणे, पुतिन स्वतःला ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी मानतात.

पुतिन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे पालन करतात
व्लादिमीर पुतिन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे पालनपोषण करतात. ते रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये वारंवार सहभागी होतात आणि धार्मिक सण आणि प्रार्थना सेवांमध्ये त्यांना पाहिले जाते. जानेवारी २०२५ मध्ये पुतिन एका ऑर्थोडॉक्स ख्रिसमस मेळाव्यात दिसले. पुतिन रशियाला ख्रिश्चन धर्म आणि प्राचीन नैतिक मूल्यांचे रक्षक म्हणून दाखवतात. खरं तर रशियामध्ये अंदाजे १४२ दशलक्ष लोक राहतात, जे विविध धर्मांचे पालन करतात. Vladimir Putin Religion
रशियात अर्धे लोक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. तर रशियाची अर्धी लोकसंख्या रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे पालन करते. ख्रिश्चनांमध्ये त्यांच्या श्रद्धेवर आधारित तीन विभाग आहेत: कॅथोलिक, प्रोटेस्टंट आणि ऑर्थोडॉक्स. अहवालांनुसार, जगभरात ३० कोटी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आहेत, त्यापैकी अंदाजे १० कोटी रशियामध्ये राहतात. २००७ मध्ये टाइम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, पुतिन यांनी त्यांच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धांबद्दल विचारले असता स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र धर्माचा राजकारणावर आणि सार्वजनिक क्षेत्रात कसा प्रभाव पडावा? याबद्दल विचारले असता, पुतिन यांनी मोजमापाने उत्तर दिले. “सर्वोच्च देवावरील त्यांच्या श्रद्धेबद्दल” विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.











