Astro Tips : मंदिरात नारळ का फोडतात? यामागील कारण काय जाणून घ्या…

मंदिरात गेल्यानंतर आपण हमखास नारळ फोडतो. हे नारळ फोडण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात...

हिंदू धर्मात धार्मिक कार्यात आणि शुभ प्रसंगी नारळ फोडला जातो. तसेच आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे ते जाणून घेऊयात….

अहंकार त्याग

नारळाची कठीण कवटी मानवी अहंकाराचे प्रतीक आहे. ती फोडून भक्त आपला अहंकार देवापुढे अर्पण करतो, असे मानले जाते.

पूर्ण समर्पण

नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी आणि गर देवाला अर्पण होतो, जे भक्ताच्या शुद्ध आणि समर्पित मनाचे प्रतीक आहे. हे बलिदानाच्या भावनेसारखे आहे.

शुभ कार्याची सुरुवात

कोणत्याही शुभ कार्याची किंवा धार्मिक विधीची सुरुवात करताना नारळ फोडणे हे पवित्र मानले जाते, जे कार्य यशस्वी होण्याची प्रार्थना असते.

गणेशाचे प्रिय फळ

गणपतीला नारळ प्रिय आहे आणि तो अर्पण केल्याने अडथळे दूर होतात, असेही मानले जाते. 

काय आहे अख्यायिका ?

एका कथेनुसार, भगवान विष्णू पृथ्वीवर महालक्ष्मी, कामधेनू आणि कल्पवृक्ष घेऊन आले होते, आणि नारळाला ‘कल्पवृक्ष’ मानले जाते. म्हणजेच नारळ तीन गोष्टींना घेऊन आले होते. नारळाच्या झाडावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. नारळाला श्रीफळ असंही म्हणतात.

महिला नारळ का फोडत नाहीत ?

नारळ हे बीजरूपी आहे, त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात. त्यामुळे महिलांनी नारळ फोडू नये असं मानलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News