Home remedies for asthma: दमा हा एक असा आजार आहे ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तो केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही प्रभावित करतो. दम्याचे मुख्य कारण म्हणजे एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असणे. वायू प्रदूषणासारखे इतर अनेक घटक आहेत ज्यामुळे दमा होऊ शकतो. परंतु, दमा रोखण्यास मदत करणारे अनेक उपाय आहेत.

दम्याची कारणे-
बदलणारे हवामान, जसे की अचानक ढगाळ वातावरण, थंड हवामान, अति उष्णता आणि मानसिक ताण यामुळे देखील दमा होऊ शकतो. जास्त व्यायाम आणि शारीरिक हालचालींमुळे दीर्घ श्वासोच्छवास होऊ शकतो. ज्यामुळे दमा देखील होऊ शकतो. घरगुती प्रदूषकांमुळे श्वसनाचे आजार देखील होऊ शकतात, जसे की कपडे धुण्याच्या डिटर्जंटची अॅलर्जी, दूध, मासे, अंडी, टोमॅटो, भेसळयुक्त अन्न आणि पाळीव प्राण्यांशी संपर्क. आज आपण दम्यामध्ये आराम देणाऱ्या काही पदार्थांबाबत जाणून घेऊया….
लसूण-
दम्याच्या आजारासाठी लसूण वापरावे. दम्याच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे. तुम्ही शिजवलेला लसूण खाऊ शकता किंवा दुधात उकळून त्याचे सेवन करू शकता.
ओवा-
एक वाटी पाण्यात एक चमचा ओवा टाका, नंतर ते उकळवा. पाण्यातून येणारी वाफ घ्या. यामुळे दम्यापासून आराम मिळतो.
आले-
तज्ञांचे म्हणणे आहे की आल्यामध्ये विषाणूंशी लढण्याची क्षमता आहे. ते श्वास घेण्यास होणारा त्रास कमी करते. तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही आल्याचा तुकडा गरम पाण्यात उकळू शकता आणि पाणी कोमट झाल्यानंतर ते पिऊ शकता. तुम्ही आल्याचा तुकडा चावूनही खाऊ शकता.
पौष्टिक आहार-
आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. सहज पचणारा आहार घ्या.
व्यायाम-
दम्याच्या रुग्णांनी श्वास घेण्याचे व्यायाम करावेत. व्यायामामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. हा व्यायाम फुफ्फुसांमध्ये अडकलेली हवा सोडण्यास मदत करतो आणि खांदे आणि मान यांनाही आराम देतो.
ब्लॅक कॉफी-
ब्लॅक कॉफीमधील कॅफिन श्वसनमार्गातील स्नायूंना आराम देते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ब्लॅक कॉफी पिल्याने फुफ्फुसांचे योग्य कार्य होते.
झोप-
दम्याच्या रुग्णांनी जास्त झोप टाळावी. कारण या आजारात सतत झोपण्याऐवजी फ्रेश राहण्याचा प्रयत्न करावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











