Astro Tips : मंदिरातून देवाचं दर्शन घेऊन घरी परतताना ‘या’ चुका करू नका; अन्यथा…

मंदिरातून घरी परतताना लगेच पाय धुऊ नयेत, तसेच घाईघाईने इतर कामे टाळावीत, कारण यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो, असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते

मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा मनोभावे आपण भगवंताची पूजा करतो, प्रार्थना करतो. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की, जसे मंदिरात पूजा करण्याचे काही नियम असतात तसेच नियम मंदिरातून परततानाचे देखील नियम असतात. जे पाळणेही आवश्यक आहे.

घरी आल्यानंतर प्रसाद ग्रहण करावा

मंदिरात मिळालेला प्रसाद घरी आल्यानंतर सेवन करावा. मंदिरात मिळालेला प्रसाद घरी आल्यानंतर कुटुंबासोबत खाणे शुभ मानले जाते; त्यामुळे तो वाटेत खाऊ नये.

नकारात्मक विचार टाळा

मंदिरातून बाहेर पडताना मनात नकारात्मक विचार आणू नयेत, यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही, असे मानले जाते. दर्शनानंतर लगेचच नकारात्मक विचार करणे, ईर्ष्या करणे किंवा कोणाबद्दल वाईट बोलणे टाळावे. यामुळे पूजेचा सकारात्मक परिणाम कमी होतो, असे म्हटले जाते.

अस्वस्थपणे परत येऊ नये

घाईगडबडीत किंवा अस्वस्थ होऊन मंदिरातून परत येणे टाळावे, शांत मनाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने परत यावे. घाईघाईत किंवा धावपळ करत मंदिरातून बाहेर पडू नका. शांतपणे आणि देवाचे आभार मानत बाहेर पडा.

पाय लगेच न धुणे

मंदिरातून घरी आल्यानंतर लगेच पाय धुवू नयेत. देवाच्या दर्शनानंतर घरी परतताना लगेच पाय धुऊ नयेत, कारण यामुळे मंदिरातून आणलेली सकारात्मक ऊर्जा कमी होते, असे वास्तुशास्त्र सांगते. मंदिरातून आणलेली सकारात्मक ऊर्जा पाय धुतल्याने कमी होते, म्हणून घरी आल्यावर थोडा वेळ थांबा आणि नंतर पाय धुवा.

इतर कुठेही जाऊ नये

मंदिरातून घरी परतताना इतर दुकाने किंवा ठिकाणी थांबू नका, थेट घरी या.  इतरत्र कुठेही थांबू नये आणि थेट घरी यावे, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकून राहील. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेचच मित्र-मैत्रिणींना भेटणे, गप्पा मारणे किंवा इतर ठिकाणी थांबणे टाळावे, असे शास्त्र सांगते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News