Sankashti Chaturthi Wishes : संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा!

प्रत्येक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. डिसेंबर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी रविवार 7 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. या खास दिवसाच्या प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा.

प्रत्येक शुभ कार्याच्या सुरवातीला गणपती बाप्पाची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि दुसरी कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यात दोन संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या पवित्र दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करून त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येतो, अशी श्रद्धा आहे. अशा या खास दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास पद्धतीने शुभेच्छा देऊ शकता….

संकष्टी चतुर्थी तिथी 

पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी  7 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी सुरु होईल. या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजून 3 मिनिटांनी होईल. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत  7 डिसेंबर 2025 रोजी केले जाईल.

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा 2025

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

आज श्रीगणेशाची आराधना केल्याने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा..!

कितीही मोठी समस्या असू दे,
विघ्नहर्त्याच्या नावातच समाधान आहे..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे..
विघ्न दूर करण्यासाठी बळ मिळू दे..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणांस लाभो;
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेशभक्तांना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर कर,
दयाळू राहा आणि सर्वांची कामे पूर्ण कर..
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

श्री गणेशाची आराधना केल्याने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

संकटांवर मात करणारा
गणपती तुम्हाला यश देवो,
तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मोदकाप्रमाणे तुमचे जीवन
गोड आणि चंद्रासारखे तेजस्वी व्हावे
हीच संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने
गणपती चरणी प्रार्थना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

चंद्रदर्शन आणि बाप्पाचं स्मरण
देईल आपल्याला नवे जीवनाचं कारण
हरू दे चिंता, दूर होवोत त्रास
गणरायाच्या कृपेने मिळो समाधानाचा श्वास
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणराया सर्वांवर कृपा करतो
संकष्ट चतुर्थीचं महत्त्व सांगतो
भक्तीच्या मार्गावर चालू या
विघ्नांचा नाश करू या
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News