Astro Tips : शनिवारी सकाळी ‘या’ गोष्टी दिसल्या तर तुमच्यावर शनिदेवाचा कृपा

शनिवार हा शनिदेवाचा दिवस असतो. या दिवशी या गोष्टी दिसणे म्हणजे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या अडचणी दूर होणार आहेत, असे मानले जाते.

शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. अशा वेळी जर तुम्हाला सकाळी शनिदेवाच्या आवडत्या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की हीच वेळ तुमचे नशीब उजळण्याची आहे. तुमच्यावर शनिदेवाचा कृपा आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात…

काळा कुत्रा

काळा कुत्रा दिसणे शुभ मानतात, कारण त्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते. त्याला भाकरी किंवा दूध दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात असे म्हणतात.

सफाई कर्मचारी

शनिवारी सकाळी सफाई कर्मचारी दिसणे हे शनिदेवाची कृपा दर्शवते. जे तुमच्यावर लवकरच चांगले दिवस येण्याचे संकेत देतात; या परिस्थितीत, त्यांना काहीतरी देणे (जसे की पैसे किंवा अन्न) खूप शुभ मानले जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात, ज्यामुळे अडथळे दूर होतात आणि भाग्य उजळते. घराबाहेर पडल्यावर सफाई कर्मचारी दिसणे, विशेषतः तो रस्ता झाडत असेल तर, शनिदेवाच्या कृपेचे लक्षण आहे.

भिकारी

दारात आलेला भिकारी किंवा भिक्षुक यांना शिवीगाळ न करता, शक्य असल्यास दानधर्म करणे शुभ मानले जाते, हे शनिदेवाच्या कृपेचे लक्षण आहे.

या गोष्टी दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील शनिदेवाची साडेसाती किंवा ढैया संपत असून, आता तुमच्यावर त्यांची कृपा होणार आहे आणि कामात यश मिळून भाग्य उजळणार आहे, असे मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News