Vastu Tips : आजकाल सर्वांच्याच घरी फ्रीज बघायला मिळतो. फ्रीज असल्याने अन्न धान्य भाजीपाला अत्यंत सुरक्षित राहतात. फ्रिजमध्ये ठेवलेली कोणती वस्तू खराब होत नाही. त्यामुळे फ्रिज ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट बनली आहे. फ्रिज घरात असलेला चांगलंच असतं, परंतु वास्तुशास्त्रानुसार फ्रीजवर काही वस्तू ठेवल्याने घरात गरीबी येऊ शकते. चला तर जाणून घेऊया, नेमक्या कोणकोणत्या वस्तू फ्रिजवर ठेवू नयेत.
पाणी किंवा फिश अॅक्वेरियम
वास्तुशास्त्रात म्हटले आहे की फ्रीज अग्नि तत्वाचे प्रतीक आहे, म्हणून पाण्याच्या तत्वाशी संबंधित वस्तू फ्रीज वर ठेवू नयेत. रेफ्रिजरेटरच्या वर पाणी किंवा फिश अॅक्वेरियम ठेवल्याने घरात वाद आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. Vastu Tips

औषधे
औषधे फ्रीज वर ठेवू नयेत. फ्रीज वर औषधे ठेवल्याने घरात आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. शिवाय, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनाही त्रास होऊ शकतो.
निरुपयोगी आणि जुन्या वस्तू
निरुपयोगी आणि जुन्या वस्तू कधीही रेफ्रिजरेटरच्या वर ठेवू नयेत. असे केल्याने घरात गरिबी येऊ शकते आणि मानसिक समस्यांचा धोका वाढू शकतो. शिवाय, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.
देव-देवतांचे फोटो आणि मूर्ती
देवी-देवतांचे फोटो, मूर्ती आणि धार्मिक ग्रंथ फ्रिज वर कधीही ठेवू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.
पैसा
रेफ्रिजरेटरच्या वर पैसे ठेवू नका. असे करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते..
दागिने
सोने, चांदी, पितळ किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले दागिने फ्रीज वर ठेवू नका. असे केल्याने घराची शांती बिघडते आणि आर्थिक परिस्थिती बिघडते
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











