Kalki 2898 AD : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही महिन्यांपासून आपल्या 8 तासांच्या वर्क-शिफ्टच्या मागणीमुळे चर्चेत आहे. त्यांच्या या मागणीचा थेट परिणाम त्यांच्या प्रोजेक्ट्सवर झाला असून ‘Kalki 2898 AD’ आणि ‘Spirit’ या दोन मोठ्या चित्रपटांतून त्यांची निवड रद्द झाली. ‘Spirit’मधून त्यांचा आधीच एग्झिट झाला होता, तर सप्टेंबर महिन्यात दीपिकाने नाग अश्विन दिग्दर्शित ‘Kalki 2898 AD’चा सिक्वेलही सोडल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असून, दीपिकाच्या जागी प्रियंका चोपडाला घेतले जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
प्रियांकाने सांगितली तगडी फी (Kalki 2898 AD)
ताज्या माहितीनुसार, ‘Kalki 2898 AD’मध्ये प्रियंका चोप्रा एंट्रीही तितकीस सोपी नाही. मेकर्सना तिच्यासोबत देखील त्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे, ज्या दीपिकासोबत झाल्या आणि ज्यामुळे दीपिकाला हा प्रोजेक्ट सोडावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका चोप्रा सोबत चर्चा सुरू आहे, परंतु तिनेही दीपिकासारखीच फीची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिच्या कास्टिंगचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा बनला आहे.

प्रियंकाने फीव्यतिरिक्त शूटिंग शेड्यूलसंदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या केल्याची माहिती समोर येत आहे. एका सूत्राने सांगितले की, प्रियंका सध्या आपल्या मुलीची जबाबदारी सांभाळत असल्याने तिने मेकर्सकडे वेळेत लवचिकता ठेवण्याची विनंती केली आहे. मात्र, या सर्व गोष्टी असूनही ती आपल्या मुलीसह शूटिंग लोकेशनवर जाण्यास तयार असल्याचेही त्या सूत्राने स्पष्ट केले. Kalki 2898 AD
आणखी कोणाची नावे चर्चेत
दरम्यान, प्रियंकासोबतच या मोठ्या प्रोजेक्टसाठी इतर अभिनेत्रींचीही नावे चर्चेत आहेत. या यादीत आलिया भट्ट, साई पल्लवी आणि अनुष्का शर्मा यांचा समावेश आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचे मेकर्स असा चेहरा निवडू इच्छितात, जो स्टार पॉवर, फॅन फॉलोइंग आणि सिनेमॅटिक प्रेझेन्सच्या बाबतीत प्रभासच्या तोलामोलाचा ठरेल.
दीपिका पादुकोणच्या एग्झिटनंतर या कास्टिंगची चर्चा अधिक तापली आहे. सप्टेंबरमध्ये मेकर्सने सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करत दीपिका ‘Kalki 2898 AD’च्या सिक्वेलचा भाग नसल्याचे सांगितले. यानंतर समोर आलेल्या अहवालांनुसार, दीपिकाने आपल्या फीमध्ये 25 टक्क्यांची वाढ व फक्त 8 तासांच्या वर्क शिफ्टची अट ठेवली होती, जी मेकर्सना मंजूर न झाल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. या सर्व घडामोडींमुळे ‘Kalki 2898 AD’च्या सिक्वेलची लीड अभिनेत्री कोण असेल, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मेकर्सकडून अंतिम निर्णयाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.











