Rohit Sharma : रोहित शर्मा बनला 20 हजारी; भारताकडून रचला नवा इतिहास

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाकडून 20000 धावा करणारा रोहित हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 75 धावांची तुफानी केळी करताना रोहितने हा कारनामा केला.

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर आणि हिटमॅन रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाकडून 20000 धावा करणारा रोहित हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 75 धावांची तुफानी केळी करताना रोहितने हा कारनामा केला. रोहित शर्मा हा सध्या जबरदस्त फॉर्मात असून 2027 च्या वर्ल्ड कपच्या दिशेने त्यांने चांगलीच कोच केली आहे.

रोहितच्या पुढे कोण कोण ? Rohit Sharma

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे, त्याने ६६४ सामन्यांच्या ७८२ डावांमध्ये ४८.५२ च्या सरासरीने ३४,३५७ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत ५२.४६ च्या सरासरीने २७,९१० धावा केल्या आहेत. या यादीत वॉल राहुल द्रविड तिसऱ्या स्थानावर आहे. राहुल द्रविडने ५०४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५.५७ च्या सरासरीने २४,०६४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५०५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने २० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या काळात रोहितने १,९०० हून अधिक चौकार आणि ६०० हून अधिक षटकार मारले आहेत.

वनडे मध्ये सर्वाधिक षटकार

काही दिवसापूर्वीच रोहित शर्मा ने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठेवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. रोहितने आत्तापर्यंत वनडे मध्ये ३५२ पेक्षा जास्त षटकार ठोकले असून पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड तोडला आहे. वयाच्या 38 व्या वर्षीही रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. रोहितने त्याच्या फिटनेसवरही लक्ष केंद्रित केलं असून बरेच वजन कमी केले आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News