Cricket News : बीसीसीआयने टीम इंडियाच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माची उचलबांगडी करत नवख्या शुभमन गिलच्या खांद्यावर धुरा दिला. मात्र शुभमन गिलच्या कर्णधार पदावरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेत गिल उपलब्ध नसल्याने के एल राहुल याच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली ज्यात तो काहीसा यशस्वी ठरलेला दिसला. अशावेळी आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व कोणी करावे?? यावर अनेक मतांतरे आहेत. याबाबत आता खुद्द बीसीसीआयचा माजी अध्यक्ष राहिलेल्या सौरव गांगुलीला (Saurav Ganguly) विचारल असता गांगुलीने थेट त्या खेळाडूचे नाव घेतलं.
काय म्हणाला गांगुली (Cricket News)
एका पॉडकास्ट मध्ये बोलताना सर्व गांगुली म्हणाला, “मी एके दिवशी ईडन गार्डन्सवर बसलो होतो आणि कोणीतरी माझ्याकडे आले आणि विचारले की शुभमन गिलने टी-२० मध्ये कर्णधारपद भूषवावे का. मी म्हटले की त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवावे. मी त्याला विचारले, ‘हाच गिल तीन महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये होता आणि त्याने उत्तम फलंदाजी केली आणि कर्णधारपद भूषवले. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांशिवाय तो एक तरुण संघ घेऊन इंग्लंड विरुद्ध उभा राहिला होता. आणि आता, फक्त तीन महिन्यांनंतर, तुम्ही त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात? ही लोकांची मानसिकता आहे. Cricket News

कर्णधाराला धीर द्यावा लागतो
खरंतर प्रत्येक खेळाडू सोबत हीच गोष्ट घडत असते. परंतु तुम्हाला खेळाडूला धीर आणि बळ द्यावे लागते, एखाद्याला सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागतो. गिलचा इंग्लंडमधील पहिला क्वार्टर सोनेरी होता, परंतु एका क्वार्टरनंतर, तीच व्यवस्था त्याच्यात दोष शोधत आहे. जर तीन महिन्यांच्या कालावधीत कर्णधाराचे मूल्यांकन केले तर कोणताही कर्णधार स्वतःच्या नेतृत्वशैलीत वाढ करू शकत नाही. असं म्हणत सौरव गांगुलीने शुभमन गीलच्या कॅप्टनशिपची पाठराखण केली आहे. तसेच शुभमन गील हाच 2027 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार असावा असे ठाम मत सौरव गांगुलीने व्यक्त केले.











