Rashi Bhavishya 2026 : बच के रहेना बाबा!! शनि देवामुळे 2026 मध्ये या राशींचा बाजार उठणार

शनीची साडेसाती मागे लागली तर भल्याभल्यांचा बाजार उठतो. त्यामुळे माणसाच्या जीवनावर शनीचा मोठा प्रभाव असतो. सध्या 2025 हे वर्ष अंतिम टप्प्यात असून लवकरच 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षाच्या राशिभविष्यातही शनीचा परिणाम पाहायला मिळतोय

Rashi Bhavishya 2026 : राशिभविष्यात शनिदेवाचे महत्त्व खूप आहे कारण ते कर्मफळदाता, न्यायाधीश आणि शिस्त, जबाबदारी, विलंब, न्याय व कठोर परिश्रमाचे प्रतीक आहेत.  ते लोकांच्या कर्मांनुसार फळ देतात, ज्यामुळे जीवनात अडथळे येऊ शकतात . शनीची साडेसाती मागे लागली तर भल्याभल्यांचा बाजार उठतो. त्यामुळे माणसाच्या जीवनावर शनीचा मोठा प्रभाव असतो. सध्या 2025 हे वर्ष अंतिम टप्प्यात असून लवकरच 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षाच्या राशिभविष्यातही शनीचा परिणाम पाहायला मिळतोय. आज आम्ही तुम्हाला अशा तीन राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर 2026 मध्ये शनीची वक्रदृष्टी असू शकते.

कुंभ रास (Aquarius Horoscope) Rashi Bhavishya 2026

कुंभ राशीवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. तसेच, राहू लग्न भावात विराजमान असल्याने तुम्हाला फार संघर्ष करावा लागणार आहे. कोणतेही काम करताना अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं. तसेच शेजाऱ्यांचा त्रास होऊ शकतो. 2026 मध्ये तुमची अनेक कामे रखडू शकतात. तसेच अनावश्यक गोष्टींमध्ये पैसा खर्च होऊ शकतो.

सिंह रास (Leo Horoscope)

नवीन वर्षात सिंह राशीवर शनिची वक्रदृष्टी पाहायला मिळेल. त्याचबरोबर या राशीवर शनीचा सर्वात कठीण काळ सुरु राहणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी 2026 मध्ये सावधगिरी बाळगावी. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवावे. कारण 2026 मध्ये अचानकपणे तुम्ही पैसे गमावू शकता. 2026 मध्ये तुमच्या घरातील वातावरण नकारात्मक राहण्याची शक्यता आहे तसेच मानसिक ताणतणाव वाढू शकतो. Rashi Bhavishya 2026

धनु रास (Saggitarius Horoscope)

नवीन वर्षात शनीच्या मार्गी चालीचा धनु राशीवर अशुभ परिणाम पाहायला मिळणार आहे.  नवीन वर्षात पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. रागावर नियंत्रण ठेवा. कोणाशी शत्रुत्व निर्माण करू नका. बोलण्यावर ताळा ठेवा.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News