अनेकदा अनेकजण आपल्या घरातील खोल्यांना वास्तुशास्त्रानुसार रंगवत नाहीत, या चुकीमुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो.आज आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, घरातील बेडरूम, किचन आणि इतर जागेवर कोणत्या प्रकारचा रंग दिला गेला पाहिजे चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
कोणते रंग वापरावेत ?
वास्तूमध्ये भडक रंगांचा अतिवापर नकारात्मक ऊर्जा आणू शकतो, म्हणून त्याऐवजी हलके आणि शांत रंग, वापरावेत. या रंगांमुळे घरात सकारात्मकता, शांती आणि सुसंवाद वाढतो, जे आरोग्य आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते, तर गडद रंग टाळावेत.

हॉल
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील हॉलमध्ये पिवळा, हिरवा, निळा, किंवा पांढरा रंग निवडा, जे ऊर्जा आणि शांतता देतात. हॉलसाठी हे रंग उत्तम असून ते सकारात्मक वातावरण तयार करतात, तर गडद आणि उग्र रंग टाळावेत.
बाथरूम
बाथरूममध्ये पांढरा किंवा गुलाबी रंग शुभ मानला जातो.
घरातील देवघर
देवघर हे आपल्या घरातील अत्यंत पवित्र स्थान मानले जाते आणि म्हणूनच या ठिकाणी अशा प्रकारचा रंग दिला गेला पाहिजे जेणेकरून आपले मन एकाग्र व शांत राहील. घरातील देवघर असलेल्या जागेवर नेहमी पांढरा, हलका पिवळा, किंवा हलका निळा रंग निवडा.
किचन
आपल्या घरातील किचन हे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. किचनमध्ये केशरी, पिवळा, लाल किंवा गुलाबी रंग निवडा.
बेडरूम
बेडरूम हे आपल्या वास्तुमधील एक महत्त्वाचे स्थान मानले जाते, बेडरूम मध्ये नेहमी हलके रंग लावणे गरजेचे असते जेणेकरून तुमच्या बेडरूम मधील नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा वास करू शकेल. निळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगांच्या हलक्या छटा शांत झोपेसाठी चांगल्या आहेत, भडक रंग टाळा. हलक्या छटा निवडाव्यात, जेणेकरून घरात सुख-समृद्धी नांदेल.
मुलांची खोली
लहान निळा, पांढरा, पिवळा, हिरवा, किंवा गुलाबी रंग लावू शकता. तसेच अन्य कोणतेही रंग लावू शकता परंतु ते रंग डार्क नसावे,हे रंग लाईट असतील तर मुलांना प्रसन्न सुद्धा वाटेल..
कोणते रंग टाळावेत?
वास्तुशास्त्रानुसार घरात काळा, गडद तपकिरी, तीव्र लाल, जांभळा आणि खूप भडक, उग्र रंग टाळावेत, कारण ते नकारात्मक ऊर्जा आणू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











