Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य हे प्राचीन काळातील एक विद्वान आणि अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक विषयातील अचूक ज्ञान होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ग्रथांची रचना केली आहे. त्या ग्रंथांचा उल्लेख आजही होतो. त्यांच्या उपदेशांना आजही चाणक्य नीती म्हणून ओळखले.
चाणक्य नितीमध्ये मनुष्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याचे अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत असतो. या अडचणी दूर करण्याचे उपाय शोधत असतो. या अडचणी कशा दूर करायच्या याचा सल्ला आचार्य चाणक्यांनी दिला आहे. यामध्ये प्रत्येक अडचणीसाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. आजही असे अनेक लोक आहेत जे अडचणीमध्ये चाणक्य नीतीचा अवलंब करतात. आज आपण गरीबाला श्रीमंत बनवणाऱ्या काही गोष्टी पाहणार आहोत.
शिक्षण-
आचार्य चाणक्यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीला गरीबीतून श्रीमंत बनवण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. शिक्षणामुळे कोणत्याही व्यक्तीला अडचणीतून मार्ग काढता येते. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्हाला अडचणीच्या काळात बाहेर पडण्यास मदत मिळते. पण शिक्षणच नसेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीवर मात करणे कठीण जाते. त्यामुळे स्वतः ला शिक्षणाच्या साहाय्याने मजबूत बनवा.
निर्णय क्षमता-
आचार्य चाणक्यांच्या मते, तुम्ही संधीची प्रतीक्षा करत बसला तर तुमची प्रगती होणे अशक्य आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. कारण विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातो. त्यामुळे स्वतःमध्ये निर्णय क्षमता विकसित करा.
मोठी स्वप्ने-
चाणक्य नीतीनुसार मनुष्याला नेहमी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही मोठी स्वप्ने प[पाहता तेव्हा तुमच्यामध्ये एक जिद्द निर्माण होते. एक आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू लागता. आणि एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळते. त्यामुळे नेहमीच मोठी स्वप्ने बघत राहा. परंतु फक्त स्वप्ने पाहू नका त्यासाठी कष्टसुध्दा करा.
कष्ट आणि शिस्त-
चाणक्य नीतीनुसार तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला आयुष्यात कष्ट तर केलेच पाहिजेत. शिवाय शिस्तसुद्धा लावून घेतली पाहिजे. कारण श्रीमंत बनण्यासाठी काही गोष्टींमध्ये शिस्त असणे अत्यंत गरजेचे आहे. जसे कि वेळेचे महत्व, बुद्धी चातुर्याने निर्णय घेणे इत्यादी.
चांगल्या लोकांची संगत-
आचार्य चाणक्यांच्या मते, तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या संगतसुद्धा महत्वाची भूमिका बजावते. कारण तुम्ही कोणत्या लोकांमध्ये राहता, फिरता, उठता-बसता यावर तुम्ही प्रगती अवलंबून असते. चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये राहिल्यास तुमची प्रगती होते. परंतु संकुचित विचारांच्या लोकांमध्ये राहून तुमचे विचार आणि प्रगतीसुद्धा खुंटते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





