आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729 वा संजीवन समाधी उत्सव संपन्न; लाखो वारकऱ्यांची उपस्थिती

Rohit Shinde

पुणे जिल्ह्यातील आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वैभवी रथोत्सव सोहळा संपन्न झाला. हजारो वारकऱ्यांनी राज्यभरातून या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे हा सोहळा आणखी दिमाखदार झाला. खरंतर शेकडो वर्षांपूर्वी ज्या आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा मोठा छळ झाला. त्याच आळंदी नगरीत ज्ञानेश्वर माऊलींना लोकांनी, वारकऱ्यांनी डोक्यावर घेतल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत असते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आळंदी येथे अत्यंत पवित्र स्थळी आहे. भक्तांच्या मते, ज्ञानेश्वर महाराजांनी देह त्याग न करता संजीवन समाधी घेतली. त्यांच्या अध्यात्मिक शक्ती, भक्तीभाव आणि ज्ञानयोगाचे प्रतीक म्हणून ही समाधीस्थान आजही लाखो भाविकांना आकर्षित करते. वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून आळंदी ओळखली जाते. दरवर्षी आषाढी वारीपूर्वी येथे भव्य प्रस्थान सोहळा होतो, ज्यात देशभरातून भक्त सहभागी होतात. समाधीस्थानी शांतता, ऊर्जा आणि दिव्य अनुभूती मिळते. संत ज्ञानेश्वरांची ओवी आणि भावार्थ दीपिका आजही मानवतेस प्रेरणा देत राहतात. आज आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय ?

संजीवन समाधी म्हणजे संत किंवा सिद्ध पुरुषांनी देह सोडण्याची एक अद्वितीय आणि अत्यंत आध्यात्मिक पद्धत. यात व्यक्ती मृत्यू येण्यापूर्वीच पूर्ण चैतन्य, समाधी अवस्था आणि आत्मबोधामध्ये राहून स्वतःहून देहत्याग करतो. साधारण मृत्यू आणि संजीवन समाधी यामध्ये फरक असा की संजीवन समाधीत संत पूर्ण जाणीवेत, ध्यानस्थितीत आणि मन-प्राण नियंत्रणात ठेवून समाधी घेतात. भारतीय अध्यात्मात ही अवस्था अत्यंत उच्च कोटीची मानली जाते. संत ज्ञानेश्वर, संत नरहरी सोनार, संत एकनाथ यांसारख्या महान संतांनी संजीवन समाधी घेतल्याचा उल्लेख पुराण, संतवाङ्मय आणि लोकश्रद्धांमध्ये आढळतो.

टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.

ताज्या बातम्या