Garud Puran : मृत्यूबाबत गरुड पुराण काय सांगते? मृत्यू जवळ आल्यावर प्रत्येक व्यक्तीला मिळतात ‘हे’ संकेत

गरुड पुराणाचा पाठ तेव्हाच केला जातो जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच, मृत्यूच्या 1 तास आधी त्याला काही संकेत दिसू लागतात.

हिंदू धर्मात अठरा महापुराण आहेत. गरुड पुराण हे त्यापैकी एक आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, गरुड पुराणाचे पठण केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष मिळण्यास मदत होते आणि मृताच्या कुटुंबातील सदस्यांना आध्यात्मिक शांती मिळते. मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला काही विशिष्ट संकेत मिळतात. या सर्वांबद्दलची माहिती गरुड पुराणात दिली आहे. गरुड पुराणानुसार, जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या मृत्यूआधीच त्यांना काही संकेत मिळतात. हे संकेत नेमके कोणते ते जाणून घेऊयात…

मृत्यूपूर्वी अनेकांना अशुभ चिन्हे दिसतात

जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा तिला काही अशुभ संकेत दिसू लागतात. व्यक्तीला आरशात, पाण्यात, तेलात किंवा तुपात स्वतःचे प्रतिबिंब दिसत नाही, हे मृत्यू जवळ आल्याचे लक्षण मानले जाते. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी व्यक्तीला एक रहस्यमय दरवाजा दिसतो, ज्यातून तेजस्वी पांढरा प्रकाश येत असतो. मृत्यूच्या काही काळ आधी, व्यक्ती चिंताग्रस्त होऊ लागते, त्याचा आवाज डळमळू लागतो, त्याला इच्छा असूनही बोलता येत नाही. किंबहुना त्याला यमदूत दिसू लागतात आणि त्यांच्या भीतीमुळे तो बोलणे बंद करतो.

आजूबाजूला त्याच्या पूर्वजांचे आत्मे

गरुड पुराणानुसार, जेव्हा पण व्यक्तीची शेवटची वेळ येते तेव्हा त्याला जी व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींची सावली दिसते.मृत्यू जवळ आल्यावर व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्या वेळी त्याला असे काही अनुभव येऊ शकतात, ज्यात त्याला हयात नसलेले प्रियजन दिसतात. या अनुभवांचा अर्थ असा होतो की, ते पूर्वज त्याला बोलवत आहेत किंवा आपल्याकडे बोलावून घेत आहेत, असे त्या व्यक्तीला वाटते. 

कुत्रा तुमचा पाठलाग करू लागतो

घरातून बाहेर पडताच जर कुत्रा तुमच्या मागे पडत असेल तसेच हा प्रकार सलग 4 दिवस तुमच्याबरोबर होत असेल तर तुमचा मृत्यू कधीही होऊ शकतो.

हातावरील रेषा नाहीशा होतात

व्यक्तीच्या हातावरील रेषा म्हणजेच हस्तरेषा या त्याच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगतात. मात्र जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा हस्तरेषा धुसर दिसू लागतात. काही लोकांच्या हतावरील रेषा तर हळूहळू नाहीश्या होऊन पूर्णपणे दिसेनाश्या होतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News