Aliens Temple In India : भारतातील एकमेव एलियन मंदिर!! 11 फूट खोल, दररोज होते पूजा

तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात हे केलीस मंदिर उभारण्यात आला आहे. हे मंदिर फार जुने नाही तर अलीकडेच त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रामगौनदनूर येथील रहिवासी लोगानाथन यांनी ही मंदिर बांधल आहे.

Aliens Temple In India : एलियन्स म्हणजे परग्रहवासी…. पृथ्वी सोडून इतर कोणत्या तरी ग्रहावर एलियन्स असतील असं म्हटलं जातं… एलियन्स कसे असतील?? ते कसे दिसतील ?? माणसापेक्षा ते ताकतवार असू शकतात का?? याबाबत आपल्याला काहीच ठोसपणे माहीत नाही. परंतु एलियन्स असू शकतात हे मानणारा वर्ग नक्कीच मोठा आहे.  परंतु हद्द तर तेव्हाच आली जेव्हा समजलं की आपल्या भारतात चक्क एलियन्सचे मंदिर आहे. होय, तुम्हाला वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल. परंतु दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये हे मंदिर उभारण्यात आला आहे.

कुठे आहे एलियन चे मंदिर (Aliens Temple In India)

तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात हे केलीस मंदिर उभारण्यात आला आहे. हे मंदिर फार जुने नाही तर अलीकडेच त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रामगौनदनूर येथील रहिवासी लोगानाथन यांनी ही मंदिर बांधल आहे. हे मंदिर जमिनीपासून सुमारे ११ फूट खाली आहे. याठिकाणी काळ्या दगडापासून बनवलेल्या एलियनची मूर्ती बसवण्यात आली आहे. दररोज या मंदिरात केल्यास ची पूजा केली जाते हळूहळू मंदिराची कीर्ती वाढत गेली आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांचा ओघही वाढत गेला.

एलियन मंदिर का बांधले गेले?

एलियन मंदिर (Aliens Temple In India) बांधणारा लोगानाथन म्हणतो की त्याने स्वप्नात एलियन पाहिले होते, ज्यामुळे त्याला निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. त्याचा असा विश्वास आहे की एलियन भविष्यात नैसर्गिक आपत्तींपासून जगाला वाचवू शकतात, कारण त्यांच्याकडे मानवांपेक्षा जास्त शक्ती आहेत. लोगानाथन असाही दावा करतो की त्याने एलियनशी बोलले आहे, परंतु त्याच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.

या मंदिरात इतर देव-देवतांच्या मूर्ती देखील आहेत

या एलियन मंदिरात इतर हिंदू देवतांच्या मूर्ती देखील बसवण्यात आल्या आहेत, ज्यात भगवान विष्णूचा वराह अवतार आणि शिवलिंग यांचा समावेश आहे. लोगानाथन म्हणतात त्याने त्याचे गुरु सिद्ध भाग्य यांच्या आज्ञेनुसार एलियन मंदिर बांधले. भविष्यात, अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या मंदिरात अधिक देवतांच्या मूर्ती बसविल्या जातील.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.).


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News