MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Feng Shui Tips: पाकिटात नेहमी ठेवा ‘या’ वस्तू, अजिबात येणार नाही आर्थिक टंचाई

Published:
लोक विविध अडचणींमध्ये फेंगशुई शास्त्राची मदत घेतात. सुरुवातीपासून पाश्चिमात्य देशांमध्ये फेंगशुईचा वापर केला जातो.
Feng Shui Tips:  पाकिटात नेहमी ठेवा ‘या’ वस्तू, अजिबात येणार नाही आर्थिक टंचाई

Feng Shui Tips to Keep Money in Your Pocket:   बऱ्याच लोकांना चांगला पगार असतो. परंतु तरीसुद्धा त्यांच्याच्याजवळ पैसेच शिल्लक राहात नाहीत. त्यामुळे लोक सतत चिंतेत असतात. अनेकदा समजतच नाही कमावलेला इतका पैसा नेमका गेला कुठे. अशावेळी फेंगशुईच्या काही टिप्स तुम्हाला पॉकेट्मध्ये पैसे टिकवण्यात मदत करू शकतात.

लोक विविध अडचणींमध्ये फेंगशुई शास्त्राची मदत घेतात. सुरुवातीपासून पाश्चिमात्य देशांमध्ये फेंगशुईचा वापर केला जातो. अलीकडच्या काळात भारतामध्येसुद्धा फेंगशुईची मदत घेतली जात आहे. आज आपण नेहमी पाकिटात पैसे टिकवण्यासाठी फेंगशुईच्या काही खास टिप्स पाहणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुमच्या पाकिटात नेहमीच पैसे राहतील. तुमचा पाकीट कधीच रिकामा राहणार नाही. चला पाहूया या खास टिप्स…

 

तमालपत्र-

खिशात तमालपत्र ठेवल्यास अनेक चांगले लाभ मिळतात. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. यासाठी एका पेन्सिलच्या मदतीने आपली इच्छा या तमालपत्रावर लिहून ते आपल्या खिशात ठेवा. असे केल्याने पैसे आकर्षित होण्यास मदत मिळते. परंतु लक्षात ठेवा प्रत्येक आठवड्याला हे तमालपत्र बदलत राहा. आणि जुने तमालपत्र चांगल्या भावनेने व्यवस्थित जाळून टाका. असे केल्याने अडचणी दूर होतात.

 

फेंगशुई नाणे-

लाल रंगाच्या दोऱ्याने बांधलेले फेंगशुई नाणे आपल्या खिशात ठेवणे अत्यंत शुभ समजले जाते. परंतु लक्षात ठेवा खिशात ६ नाणी असावीत. अंकशास्त्रानुसार ६ हा आकडा अत्यंत शुभ असतो. तसेच फेंगशुईच्या नाण्यांचा धातू पैसे आकर्षित करण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या खिशात फेंगशुईचा नाणे ठेवावेत.

 

ग्रीन ऍव्हेंच्युरीन-

रत्न शास्त्रानुसार हे रत्न धन आकर्षित करते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर हे रत्न खिशात ठेवा. यामुळे तुम्हाला पैशांची प्राप्ती होते. या स्टोनच्या वापराने व्यक्तीचा भावनिक समतोलसुद्धा चांगला राहतो. शिवाय तुमचा खिसा कधीच रिकामा होत नाही.

 

सिट्रिन क्रिस्टल-

सिट्रिन क्रिस्टल हे पिवळ्या रंगाचे एक रत्न असते. या रत्नामध्ये सूर्याची शक्ती असते. त्यामुळे हे रत्न जवळ ठेवल्यास नेहमीच ऊर्जा राहते. तसेच हे रत्न चांगल्या गोष्टी आकर्षित करते. हे रत्न खिशात ठेवल्याने पैसे आकर्षित होतात. आर्थिक चणचण भासत नाही. सुखसमृद्धी येते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)