MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

Angaraki Sankashti Chaturthi 2025 Puja Vidhi: अंगारकीची पूजा कशी कराल? महत्त्व काय? चंद्रोदयाची वेळ, तिथी सर्वकाही

Written by:Smita Gangurde
Published:
Angaraki Sankashti Chaturthi 2025: मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं संबोधलं जातं. अंगारकी चतुर्थीला गणरायाची उपासना केली तर वर्षभरात केलेल्या संकष्टीचं फल एका अंगारकीच्या व्रत आणि उपासनेत मिळतं अशी धारणा आहे.
Angaraki Sankashti Chaturthi 2025 Puja Vidhi: अंगारकीची पूजा कशी कराल? महत्त्व काय? चंद्रोदयाची वेळ, तिथी सर्वकाही

Angaraki Sankashti Chaturthi 2025 Date and time : श्रावणात आलेली अंगारकी चतुर्थी ही महत्त्वाची आहे. व्रतवैकल्याचा महिना असलेल्या श्रावणात आलेल्या या अंगारकी चतुर्थीला अने भाविक उपास करतील. सकाळपासून गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरात रांगाही लावतील. मात्र अंगारकीची पूजा नेमकी करायची तरी कशी याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.

मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं संबोधलं जातं. अंगारकी चतुर्थीला गणरायाची उपासना केली तर वर्षभरात केलेल्या संकष्टीचं फल एका अंगारकीच्या व्रत आणि उपासनेत मिळतं अशी धारणा आहे.

अंगारकी चतुर्थीची पूजा कशी कराल? (Angaraki Sankashti Chaturthi 2025 puja vidhi)

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लकर उठून सुचिर्भूत होण्याची गरज आहे. स्नान करुन पहाटेच्या वेळी अगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. ती पालन करावी. या दिवशी अंघोळीनंतर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. पूजाविधी करण्याची जागा स्वच्छ करावी. घराबाहेर आणि पूजा करण्याच्या जागी रांगोळी काढून परिसर सौंदर्यपूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

गणरायाची मूर्ती किंवा फोटोला स्वच्छ पुसून, त्याची पूजा करावी. गणरायाला पंचामृत आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर गणरायाच्या फोटोला गंध, शेंदूर, फुलं अर्पण करावीत. गणेश अथर्वशिर्षांचं 11, 21 याप्रमाणे गणरायासमोर पठण करावं. धूप आणि दीप लावून गणरायाची आरती करावी. त्यानंतर दिवसभर फलाहार आणि उपासाचा सात्विक आहार ग्रहण करावा.

संध्याकाळी अंगारकीचा मुहूर्त पाहून चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा करावी, त्याला अर्घ्य अर्पण करावे. गणरायाला नैवेद्य दाखवून आरती करावी आणि उपास सोडावा. नैवेद्यात मोदक, फळं, मिठाई यांचा आवर्जून सहभाग असेल याकडे लक्ष द्यावे. गणरायाचं नामस्मरण दिवसभर होईल याची काळजी घ्यावी, दिवसभर मन शांत ठेवावं.

काय आहे अंगारकी चतुर्थीचं महत्त्व? (Angaraki Sankashti Chaturthi 2025 Importance)

अंगारक म्हणजेच मंगळ देवानं गणरायाची तपश्चर्या केली होती, त्यावर प्रसन्न झालेल्या गणरायानं मंगळाला वरदान दिलं. ज्या दिवशी मंगळवारी चतुर्थी येईल, त्या दिवशी ती तिथी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल, असं वरदान देण्यात आलं होतं. ज्या व्यक्तींना मंगळाचा त्रास आहे, अशांनी अंगारकी केल्यास त्यांच्या आयुष्यातील दु:ख कमी होतील अशी धारणा आहे.

श्रावण महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी (Angaraki Sankashti Chaturthi 2025 Time)

मंगळवार 12 ऑगस्ट 2025 सकाळी 8.40 वाजता अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी सुरू होईल.
बुधवार 13 ऑगस्ट 2025 सकाळी 6.36 वाजता अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी समाप्त होईल.

अंगारकी चतुर्थीचा उपवास कधी सोडाल? 

चंद्रोदयाची वेळ रात्री 9. 17 वाजता असून त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता.