MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

अंगारक संकष्टी चतुर्थीला उपवासासाठी बनवा वरीचे थालीपीठ, जाणून घ्या रेसिपी

Published:
उपवासाच्या पदार्थांमध्ये वरीचे विशेष महत्व आहे. त्यामुळेच आज आपण वरीचे थालीपीठ पाहूया.
अंगारक संकष्टी चतुर्थीला उपवासासाठी बनवा वरीचे थालीपीठ, जाणून घ्या रेसिपी

Angaraki Sankashti Chaturthi 2025:   अंगारक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केली जाते. यादिवशी सर्वजण उपवास करतात. उपवासादिवशी काही विशिष्ट पदार्थच खाल्ले जातात. त्यामुळे आपण उपवासासाठी वरीचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया…

 

वरीचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य-

 

1/2 कप वरी
सैंधव मीठ चवीनुसार
2 टेबलस्पून कोथिंबीर
2 उकडलेले बटाटे
2-3 टेबलस्पून शेंगदाणे कूट
1-1/4 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून जीरे पूड (जीरे भाजून)
2-3 टेबलस्पून तूप

 

वरीचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी-

 

वरी स्वच्छ धुवून घेऊन त्यात पाणी घालून 1/2 तास भिजत ठेवावी.

आता त्यातील पाणी काढून घ्या व मिक्सरमधुन बारीक वाटून घ्या. बटाटे शिजवून, सोलून, मॅश करा. शेंगदाणा कूट, जीरे पूड, लाल तिखट, कोथिंबीर, सैंधव मीठ, साखर घालून एकजीव करा.

गॅसवर तवा तापत ठेवा. तव्यावर तूप घालून पसरवून घ्या. एक पिठाचा गोळा घेऊन तव्यावर थालीपीठ पाण्याचा हात लावून थापून घ्या.

त्यावेळी गॅस मंद आचेवर ठेवावा. नंतर मध्यम आचेवर ठेवून तूप सोडून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या. अशा पध्दतीने सगळी थालीपीठ करून घ्या.

हे थालीपीठ दह्यासोबत खा.