दिवाळीपूर्वी, ‘छोटी दिवाळी’ हा सण साजरा केला जातो. हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. याला ‘नरक चतुर्दशी’ असेही म्हणतात. या दिवसाला ‘पहिली अंघोळ’ असंही म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते. दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष तिथीला नरक चतुर्दशी साजरी करतात. यालाच छोटी दिवाळी असंही म्हणतात.
नरक चतुर्दशीला काय करावे
- नरक चतुर्दशीच्या दिवशी हनुमान आणि यम यांची पूजा करा.
- याशिवाय भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचीही परंपरा आहे.
- घराची विशेष साफसफाई करा.
- गंगाजल शिंपडून घर आणि मंदिर शुद्ध करा.
- संध्याकाळी दिवा लावावा.
- घरातील वाईट गोष्टी काढून टाका.
- पूजा करताना मंत्रांचा जप करावा.
- गरीब लोकांना अन्न, पैसे, कपडे इत्यादी गोष्टी दान करा. यामुळे पुण्य प्राप्त होते.
- दिवे आणि दिव्यांनी घर सजवा.
नरक चतुर्दशीला काय करू नये
- अभ्यंग स्नान सूर्योदयापूर्वी करणे आवश्यक आहे. उशिरा स्नान करणे शुभ मानले जात नाही.
- या दिवशी घरात अंधार ठेवू नये. सर्वत्र दिवे लावावेत, कारण अंधार नकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करतो.
- नरक चतुर्दशीच्या दिवशी घर अस्वच्छ ठेवू नका. घर, शरीर आणि मन अशुद्ध ठेवू नये. स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- कोणाशीही वाद घालू नका. या दिवशी वादविवाद, भांडणे किंवा नकारात्मक विचार टाळावेत. मन शांत आणि सकारात्मक ठेवावे.
- तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. मांसाहार, मद्यपान आणि तामसी भोजन टाळावे. सात्विक आहार घ्यावा.
- पैसे वाया घालवू नका.
छोटी दिवाळी 2025 तारीख
यंदा नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान 20 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी पहाटे उठून उटण आणि सुंगधी तेल लावून स्नान करण्यात येतं. त्यानंतर फटाके फोडून फराळ केला जातो. यादिवशी मंदिरात जाण्याची परंपरा देखील आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)