गणपतीला आद्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे ध्यान केले जाते. असे मानले जाते की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्याने कामातील अडथळे दूर होतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. भगवान गणेशाने स्वतःच्या हाताने महाभारत काव्य लिहिले. जाणून घेऊयात त्यामागील रंजक कथा..
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
हिंदू धर्मानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या कामाची सुरूवात केली जाते, तेव्हा प्रथम भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला येणारी चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित असते. या दिवशी उपवास आणि पूजा करून भक्त गणेशाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. संकष्टी चतुर्थीला, भक्त उपवास करतात आणि रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडतात.

पौराणिक कथा
महर्षि वेदव्यास यांनी जेव्हा महाभारत रचण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते महाभारतासारख्या महाकाव्यासाठी अशा लेखकाच्या शोधात होते, जो त्यांच्या कथन आणि विचारांमध्ये व्यत्यय न आणता लेखन करत राहील. कारण जेव्हा एखादा अडथळा येतो तेव्हा विचारांच्या निरंतर प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
महर्षी वेद व्यास यांनी सर्व देवी-देवतांच्या क्षमतांचा अभ्यास केला पण ते समाधानी झाले नाहीत तेव्हा त्यांचे लक्ष गणेशाकडे वेधले गेले. महर्षी वेद व्यासांनी गणेशाजवळ जाऊन एक महाकाव्य लिहिण्याची विनंती केली. भगवान गणेशजींनी वेद व्यासजींची विनंती मान्य केल पण त्यांच्यासमोर एक अट ठेवली. अटीनुसार, लिखान सुरू केल्यानंतर, एक क्षणही कथा सांगणे थांबता येणार नाही, आणि असे झाल्यास ते लिखानाचे काम तिथेच थांबवतील. महर्षी वेद व्यास यांनी गणपतीची ही अट मान्य केली, पण त्यांनी गणेशासमोर एक अटही ठेवली. महर्षी वेद व्यास म्हणाले की मी सांगीलेल्या श्लोकाचा अर्थ लिहीन्या आधी तुम्हाला समजून सांगावा लागेल.
याचा अर्थ गणेशाला प्रत्येक शब्द समजून घेऊनच लिहायचे होते. महर्षी वेद व्यास यांची ही अट गणपतीने मान्य केली. यानंतर महाभारत महाकाव्याची रचना सुरू झाली. महाभारताचे लेखन पूर्ण होण्यास तीन वर्षे लागली असे म्हणतात. या तीन वर्षांत गणपतीने महर्षी वेद व्यासांना एक क्षणही थांबवले नाही, तर महर्षींनीही त्यांची अट पूर्ण केली. अशा प्रकारे महाभारत पूर्ण झाले.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)