हिंदू धर्मात नंदीला भगवान शिवाचे वाहन मानले जाते, तर सिंह हे माता दुर्गेचे वाहन आहे. पण भगवान गणेश इवल्याशा उंदरावर स्वार होतात. तुम्ही कधी विचार केला आहे की एवढ्या मोठ्या गणेशाचं वाहन उंदीर का आहे? श्रीगणेशाने उंदराला आपले वाहन बनवण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशीच एक कथा…
संकष्टी चतुर्थी तिथी
वैदिक पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल. या तिथीची समाप्ती 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी होईल. त्यामुळे, उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 8 नोव्हेंबर रोजी केले जाईल. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते आणि अर्घ्य अर्पण केले जाते. रात्री 7 वाजून 50 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

पौराणिक कथा
एका कथेनुसार, एकदा भगवान इंद्रदेवाने आपल्या सभेत सर्व ऋषींना आमंत्रित केले. या बैठकीला क्रौंच यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. क्रौंचचा पाय चुकून एका ऋषींच्या पायावर पडला. यामुळे संतप्त होऊन ऋषींनी क्रौंचला उंदीर बनण्याचा श्राप दिला. उंदीर होऊनही तो सुधारला नाही आणि त्याने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप धिंगाना घातला. उंदरांच्या या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या ऋषींनी गणेशाची मदत मागितली आणि त्यांना संपूर्ण कथा सांगितली. मग गणेशाने त्या बेलगाम उंदराला धडा शिकवण्यासाठी फास फेकला, त्यात तो अडकला. यानंतर तो श्रीगणेशांची माफी मागू लागला, यामुळे भगवान गणेशाला त्याची दया आली आणि त्यांनी त्या उंदराला आपले वाहन बनवले.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











