दत्त महाराजांना गोड पदार्थ अतिशय प्रिय आहेत. त्यांना नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू, केशरी गोड भात, केशरी दुध आणि पेढे यांसारखे पदार्थ अर्पण केले जातात. यासोबतच, पुरणपोळी, मोदक आणि खीर हे पदार्थही दत्त महाराजांना आवडतात. बेसनाचे लाडू हे एक पारंपरिक आणि प्रिय नैवेद्य आहे. दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे.
साहित्य
- बेसन
- पिठीसाखर
- तूप
- वेलची पावडर
- सुकामेवा (मनुका, बदाम, पिस्ता)
कृती
- एका कढईत तूप गरम करा.
- त्यात बेसन घालून मध्यम आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घ्या.
- बेसन भाजून झाल्यावर थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि सुकामेवा घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
- या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळा.
- तुम्ही वरून मनुका लावून लाडू सजवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












